भटके-विमुक्त कागदपत्रे अभियानाला परंड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद ; तीन दिवसांत ४७१ सेवा व कागदपत्रांची कार्यवाही

Spread the love

विविध प्रमाणपत्रे,शासकीय योजना व सेवांसाठी नागरिकांना एकाच ठिकाणी मार्गदर्शन

धाराशिव – शासकीय योजनांचा लाभ घेण्याची इच्छा आहे,मात्र त्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांची पूर्तता कशी करायची,अर्ज कुठे करायचा, कोणत्या विभागाशी संपर्क साधायचा,अशा अनेक अडचणींचा सामना भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना करावा लागतो.ही अडचण दूर करून त्यांना थेट शासकीय यंत्रणेशी जोडण्यासाठी सेवा संकल्प अभियान व राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता – प्रमाणपत्र अभियान २०२६’ ला परंडा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तीन दिवसांत विविध शासकीय कागदपत्रे, प्रमाणपत्रे,योजना आणि इतर सेवांशी संबंधित तब्बल ४७१ नोंदी व कार्यवाही करण्यात आली.भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना विविध शासकीय कागदपत्रे,प्रमाणपत्रे तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने परंडा तालुक्यात २७, २८ व २९ सप्टेंबर २०२६ रोजी तीन दिवसीय विशेष अभियान राबविण्यात आले. अभियानांतर्गत २७ सप्टेंबर रोजी कौडगाव,२८ सप्टेंबर रोजी आनाळा आणि २९ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय,परंडा येथे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

तीन दिवसांच्या अभियानात विविध शासकीय कागदपत्रे, प्रमाणपत्रे,शासकीय योजना आणि इतर सेवांसाठी एकूण ४७१ नोंदी व कार्यवाही करण्यात आली. यामध्ये ३३३ कागदपत्रे व प्रमाणपत्रे,तर १३८ शासकीय योजना व इतर सेवांशी संबंधित नोंदी करण्यात आल्या.

अभियानात जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र,रेशन कार्ड,आयुष्मान भारत कार्ड,पीएम-किसान, महिला शेतकरी प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र,दिव्यांग प्रमाणपत्र आणि विवाह नोंदणी यासाठी नागरिकांना मदत करण्यात आली. त्याचबरोबर श्रावणबाळ योजना,संजय गांधी निराधार योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांसाठी अर्ज व आवश्यक कार्यवाही करण्यासाठीही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.तसेच एस.टी.महामंडळाशी संबंधित ६१ नोंदी करण्यात आल्या.

कौडगाव येथील शिबिरास इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक अमोल ताकभाते यांनी भेट देऊन शिबिराची पाहणी केली आणि आवश्यक मार्गदर्शन केले. आनाळा येथील शिबिरास तहसील कार्यालयातील श्रीमती.जाधव यांनी भेट देऊन शिबिराची पाहणी करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनात इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक अमोल ताकभाते,बहुजन कल्याण अधिकारी किरण बेंडगे,तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी,तलाठी,कृषी अधिकारी,आरोग्य विभाग,महिला व बालविकास विभाग,गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

परंडा तालुक्यात तहसीलदार काकडे,नायब तहसीलदार श्रीमती. जाधव आणि पुरवठा अधिकारी श्री.पराळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभियानासाठी विशेष सहकार्य केले.

अभियानाचे नियोजन,जनजागृती, लाभार्थ्यांशी संपर्क आणि विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हास्तरीय शासकीय सदस्य गिरीश काळे,तालुका संयोजक सोमनाथ बोडरे,तालुका सहसंयोजक शशिकांत चोरमले, तसेच आश्रमशाळेतील शिक्षक सर्वश्री शिंदे,आंधळे व देवकते यांनी विशेष परिश्रम घेतले.

या अभियानामुळे भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना शासकीय यंत्रणेशी थेट जोडण्यास मदत झाली.आवश्यक कागदपत्रांसाठी कार्यवाही करण्याबरोबरच विविध शासकीय योजनांची माहिती समजून घेणे आणि त्या योजनांचा लाभ मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष सहाय्य मिळाले.

कागदपत्रांच्या अभावामुळे शासकीय योजनांपासून कोणीही वंचित राहू नये आणि प्रशासनाच्या सेवा गरजूंपर्यंत पोहोचाव्यात,या दृष्टीने हे तीन दिवस महत्त्वाचे ठरले.समाजातील शेवटच्या घरापर्यंत शासकीय सेवा व योजनांचा लाभ पोहोचविणे’ या उद्देशाने राबविण्यात आलेले हे अभियान परंडा तालुक्यात प्रभावीपणे पार पडले.

  • Related Posts

    निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी विहित वेळेत पार पाडाजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    Spread the love

    Spread the loveऔरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा बैठक धाराशिव – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि…

    दुधाळवाडीत पशुपालकांना थेट गोठ्यावर मार्गदर्शन

    Spread the love

    Spread the love‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत पशुसंवर्धन योजनांचे मार्गदर्शन शिबिर ; पशुधन विम्यासह चारा टंचाईच्या नियोजनावर भर धाराशिव – दुष्काळजन्य परिस्थितीत पशुधनासाठी पुरेसा चारा कसा उपलब्ध करायचा, उपलब्ध चाऱ्याचे नियोजन कसे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *