“दि.६ डिसेंबर परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी..फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.

Spread the love

धाराशिव :- सध्या सुरू असलेली बिदर–लातूर–धाराशिव–मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ही रेल्वे सेवा या परिसरातील हजारो प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. विद्यार्थी, शासकीय व खासगी कर्मचारी, व्यावसायिक, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात या रेल्वे सेवेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे ही रेल्वे सेवा नियमित व कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावी.तसेच दरवर्षी दि. ६ डिसेंबर रोजी भारतरत्न, परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी मुंबई येथील चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी जात असतात. धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यातूनही मोठ्या संख्येने अनुयायी या कार्यक्रमासाठी प्रवास करतात. या काळात नियमित रेल्वेमध्ये मोठी गर्दी होत असल्यामुळे अनेक प्रवाशांना प्रवास करणे कठीण जाते.त्यामुळे दि. २ डिसेंबर ते दि. १० डिसेंबर या कालावधीत धाराशिव–मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)–धाराशिव विशेष जादा रेल्वे सुरू करण्यात यावी. तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त डबे जोडून प्रवाशांची गैरसोय टाळण्यात यावी.

आपण सदर मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करुन अनुयायी यांची होणा-या गैरसोयी दुर कराव्यात असे लेखी निवेदन फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने रेल्वे विभागीय रेल्वे अधिकारी यांना जिल्हाधिकारी मार्फत दिले.निवेदनावर गणेश वाघमारे,अंकुश उबाळे,धनंजय वाघमारे, संजय गजधने, प्रविण जगताप संपतराव शिंदे यांच्या सह्या नावे आहेत.

  • Related Posts

    पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक घेणार आढावा

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. पावसातील अनिश्चितता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा सुरळीत मिळाव्यात,तसेच संभाव्य दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा…

    रस्त्यांची कामे पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, गुत्तेदारानी ड्रेनेजचे खड्डे बुजवून रस्ता एकसमान करावा…सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असून,कामे सुरू असलेल्या रस्त्यांवरून नागरिकांनी वाहतूक करणे टाळावे आणि पर्यायी रस्त्यांचा वापर करावा,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *