

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त तुळजापूर नगरीत भक्तीचा जनसागर लोटला आहे. ‘आई राजा उदो उदो’च्या गगनभेदी जयघोषात तुळजाभवानी नगरी अक्षरशः न्हाऊन निघाली आहे. यात्रेचा मुख्य दिवस उद्या गुरुवारी असून आज पाच लाखांहून अधिक भाविकांनी तुळजापुरात हजेरी लावली असून, मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.


