आई तुळजाभवानीच्या चरणी ५१.८४० ग्रॅमचे मंगळसूत्र अर्पण

Spread the love

तुळजापूर : पुणे जिल्ह्यातील गणेश नगर, सोरपटवाडी येथील मनिषा अंकुश धामे यांनी आई श्री तुळजाभवानी मंदिर येथे दर्शन घेत ५१.८४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली.
मनिषा धामे या आज सहकुटुंब तुळजापूर येथे आल्या होत्या. त्यांनी विधीपूर्वक देवीचे दर्शन घेतल्यानंतर मंगळसूत्र अर्पण केले. या प्रसंगी मंदिर परिसरात भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसून आली.
या वेळी धार्मिक विभागाचे विकास वाणी, महेश गंजे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
मंदिरात दररोज विविध भाविकांकडून देणग्या अर्पण केल्या जात असून, धामे कुटुंबीयांच्या या अर्पणामुळे पुन्हा एकदा भाविकांची आई तुळजाभवानीवरील अढळ श्रद्धा अधोरेखित झाली आहे.

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *