राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

Spread the love

तुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री तुळजाभवानी मातेचे सश्रद्ध वातावरणात दर्शन घेतले. तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात त्यांनी संपूर्ण कुटुंबासह साडीचोळीची ओटी भरून देवीचा आशीर्वाद घेतला.
यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले तसेच स्थानिक नगरसेवक मधुकर भैय्या शेळके यांच्याकडून राजे अमरसिंह जाधवराव व त्यांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.त्यांचे पौरोहित्य भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केले.
दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजे अमरसिंह जाधवराव म्हणाले, “तुळजाभवानी माता ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि आमची कुलदेवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंना याच देवीने स्वराज्य स्थापनेची प्रेरणा व शक्ती दिली. आज या पवित्र क्षेत्री सपरिवार येऊन मातेचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले, याचा मनस्वी आनंद आहे.”
पुढे बोलताना त्यांनी समाजातील सलोखा आणि समृद्धीसाठी प्रार्थना केल्याचे सांगत, “इतिहास आणि आपल्या संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे,” असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी जाधवराव परिवारातील सदस्य, स्थानिक नागरिक आणि तुळजाभवानी मंदिराचे भोपे पुजारी उपस्थित होते.यावेळी जिजामाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक श्री मधुकर भैय्या शेळके
जिजामाता तरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष सुजय शेळके,नाना कदम,स्वराज कदम,महेश शिंदे, राहुल जाधव,बालाजी तट, दशरथ तट हजर होते.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची मूर्ती अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – नांदेड येथील भाविक सचिन सैनाजी खिल्लारे यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची तुळजाभवानी देवींची मूर्ती अर्पण केली. सचिन खिल्लारे हे आज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *