आई तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो चांदीची कळशी अर्पण

Spread the love

तुळजापूर (प्रतिनिधी) : श्री आई तुळजाभवानी मंदिरात आज सकाळी पाथरी (जि. परभणी) येथील देवीचे निस्सीम भक्त वेदांत संजय कुलकर्णी यांनी सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी देवीच्या चरणी अर्पण केली.

वेदांत कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांनी सकाळी मंदिरात येऊन अत्यंत भक्तिभावाने श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी सुमारे सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली.

या प्रसंगी मंदिर संस्थानच्या वतीने वेदांत कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास वाणी, महेश गंजे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची मूर्ती अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – नांदेड येथील भाविक सचिन सैनाजी खिल्लारे यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची तुळजाभवानी देवींची मूर्ती अर्पण केली. सचिन खिल्लारे हे आज…

    अधिक मास व उन्हाळी सुट्टीनिमित्त तुळजाभवानी मंदिरातील पूजेच्या वेळेत बदल

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिरात अधिक मास व उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी पूजेच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *