श्री आई तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडवा उत्साहात साजरा

Spread the love

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री आई तुळजाभवानी देवींच्या मंदिरात गुढीपाडवा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी नववर्षाचा पहिला सण मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला मंदिरात विशेष धार्मिक महत्त्व असल्याचे यावेळी दिसून आले.

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचे औचित्य साधून पहाटे मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली. महंत तुकोजी बुवा व महंत वाकोजी बुवा यांच्या उपस्थितीत विधीवत गुढी उभारून देवीला साखरेचा हार अर्पण करण्यात आला.

पहाटे देवींची चरणतीर्थ पूजा पार पडल्यावर मंदिराच्या शिखरावर गुढी उभारण्याचा धार्मिक विधी संपन्न झाला. संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडवा सण धार्मिक उत्साह, भक्तीभाव आणि पारंपरिक रीतीरिवाजांचे पालन करत साजरा करण्यात आला. यावेळी सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, पुजारी बांधव तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *