भारतीय स्टेट बँकेकडून तुळजाभवानी मंदिर संस्थानाला २५ लाखांच्या ३ एलईडी स्क्रीन आई तुळजाभवानी चरणी अर्पण

Spread the love

तुळजापूर : भारतीय स्टेट बँक यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत अंदाजे २५ लाख रुपये किमतीचे तीन एल ए डी स्क्रीन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आल्या.
या एलएडी स्क्रीनद्वारे भाविकांना देवीजींचे सुलभपणे दर्शन घेता येण्यास मदत होणार असून मंदिर परिसरातील भाविकांना माहिती व सूचना अधिक सुलभपणे उपलब्ध होणार आहेत. भविष्यातही भाविकांच्या सुविधेसाठी आवश्यक असा सीएसआर उपक्रम राबविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.या कार्यक्रमास बँकेचे CGM नंदकिशोर सिंह, GM अनिरुद्ध कुमार चौधरी, DGM . Y. V. S. S. नागेश्वरराव तसेच डॉ.पद्माकर चांदणे (SBI तुळजापूर शाखा व्यवस्थापक) उपस्थित होते. यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी मान्यवरांचा सन्मान केला.
प्रसंगी मंदिर लेखाधिकारी संतोष भेंकी, लेखापाल तेजस कराळे तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *