निवृत्त लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार सिन्हा यांनी घेतले श्री आई तुळजाभवानी देवीचे दर्शन;मंदिर समितीकडून सत्कार – राष्ट्ररक्षणातील शौर्याची दखल

Spread the love

तुळजापूर : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना अदम्य धैर्य दाखवणारे निवृत्त लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार सिन्हा यांनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने पब्लिक रिलेशन ऑफिसर अभिजीत खेडकर यांनी त्यांचा सत्कार केला.या प्रसंगी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, हिंदू जनजागृती समितीचे श्रीराजन बुणगे, चेतन देशमाने आदी उपस्थित होते.
निवृत्त लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार सिन्हा यांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना अद्वितीय शौर्य दाखवले आहे. त्या संघर्षादरम्यान त्यांच्या हनुवटीला गोळी लागून ती मानेतून आरपार गेली, तरीही त्यांनी राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य अबाधित ठेवत लढा सुरूच ठेवला. त्यांच्या या पराक्रमाबद्दल भारतीय सेनेकडून त्यांना सेवा मेडल आणि वीरता मेडल प्रदान करण्यात आले आहे.
सध्या ते देशभरातील युवकांना एकत्रित करून क्षात्रतेज निर्माण करणे तसेच धर्माच्या आधारावर संघटन करताना समाजमाध्यमांवरील फेक आणि नकारात्मक प्रचाराला कशाप्रकारे प्रत्युत्तर द्यावे, याबाबत मार्गदर्शन करत आहेत.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची मूर्ती अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – नांदेड येथील भाविक सचिन सैनाजी खिल्लारे यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची तुळजाभवानी देवींची मूर्ती अर्पण केली. सचिन खिल्लारे हे आज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *