तुळजाभवानी मंदिरात होळी व चंद्रग्रहणानिमित्त पूजा विधींच्या वेळापत्रकात बदल

Spread the love

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून होळी (शिमगा) सण व चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील पूजा विधींच्या वेळापत्रकाबाबत महंत, पुजारी, सेवेकरी व भाविक भक्तांना जाहीर सूचना देण्यात आली आहे.

मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दि. २ मार्च २०२६ (सोमवार) रोजी होळी सणानिमित्त अभिषेक पूजेची घाट सायंकाळी ६.०० वाजता होईल. त्यानंतर रात्री ८.०० वाजता आरती व धुपारती करण्यात येणार आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच दि. ३ मार्च २०२६ (मंगळवार) रोजी सायंकाळी होणाऱ्या चंद्रग्रहणामुळे श्री देवींच्या पूजा विधींमध्ये विशेष बदल करण्यात आला आहे. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार —

सायंकाळी ६.१५ ते ६.४० या वेळेत घाट देणे, पुजेस हाक मारणे, पुजारी श्रीदेवीजवळ येणे व निर्माल्य विसर्जन करण्यात येईल.

६.४४ ते ६.४८ या वेळेत चंद्रग्रहण कालावधीत श्रीदेवींना सोवळ्यात ठेवण्यात येणार आहे.

त्यानंतर सायंकाळी ६.५५ ते रात्री ९.०० या वेळेत सिंहासन पूजा, पंचामृत स्नान, शुद्धस्नान, आरती व धुपारती होईल.

ही सूचना तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे यांनी जारी केली असून सर्व भाविकांनी व संबंधितांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *