पोवाड्यांतून शिवचरित्राचा जयघोष ; धाराशिव येथे शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक सोहळा उत्साहात

Spread the love

धाराशिव –  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध इतिहास शिवशाहीर बिहारीलाल राजपूत यांच्या दमदार पोवाड्याने झाली.याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर “जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्र गीत तसेच जिजाऊ वंदना सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे गायिली.

यानंतर शिवशाहीर राणा जोगदंड व त्यांच्या संघाकडून शाहीरी जलसा कार्यक्रम उत्साहात सादर करण्यात आला.या कार्यक्रमात शिवचरित्रातील पराक्रम,स्वराज्याची प्रेरणा आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.तसेच शुभम खोत व सहकलाकारांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

श्रीपतराव भोसले हायस्कूलचे संगीत शिक्षक महेश पाटील यांनी “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती”, “मल्हार वारी मोतीयांनी द्यावी भरून- नाहीतर देवा जातो मी दुरुन”, “आम्ही अंबेचे गोंधळी”, “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे” ही स्फूर्तीदायक गीते सादर करून वातावरण भारावून टाकले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष,जिल्हा विधी प्राधिकरण सचिव न्या.भाग्यश्री पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,उप विभागीय अधिकारी ओंकार देशमुख,नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निता अंधारे,कळंब नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती. सुनंदा कापसे,विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, आदर्श,स्वराज्य संकल्पना आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे प्रभावशाली वर्णन शिवशाहीरांनी पोवाड्यांच्या माध्यमातून उपस्थितांना ऐकविले.या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी,नागरिक, मान्यवर तसेच विद्यार्थी व युवक-युवती यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

    Spread the love

    Spread the loveश्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. आज सकाळी मंदिर परिसरातील गणेश विहार येथे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया…

    वंदे मातरमच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याची दिमाखदार सांगता

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विशेष दोन दिवसीय सांस्कृतिक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *