शिवजयंतीनिमित्त १८ व १९ फेब्रुवारीला धाराशिव येथे सांस्कृतिक सोहळा

Spread the love

धाराशिव –  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, आदर्श,स्वराज्य संकल्पना, राष्ट्रनिर्मितीतील योगदान तसेच त्यांच्या जीवनावर आधारित नाट्यरूप सादरीकरणांचा समावेश असलेले विविध कार्यक्रम १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह,नगर परिषद,धाराशिव येथे आयोजित करण्यात येणार आहेत.

दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत,तर दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिक,विद्यार्थी,युवक -युवती, महिला तसेच सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या प्रतिनिधींसाठी खुला आहे.

जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार,त्यांचा पराक्रम आणि प्रेरणादायी जीवन नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

    Spread the love

    Spread the loveश्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. आज सकाळी मंदिर परिसरातील गणेश विहार येथे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया…

    वंदे मातरमच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याची दिमाखदार सांगता

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विशेष दोन दिवसीय सांस्कृतिक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *