श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love

श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. आज सकाळी मंदिर परिसरातील गणेश विहार येथे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

या वेळी लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) रामेश्वर वाले, ओंकार काटकर, लेखापाल तेजस कऱ्हाळे, सहायक सुरक्षा निरीक्षक नवनाथ खिंडकर, सहायक स्वच्छता निरीक्षक दयानंद जोगदंड यांच्यासह श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवजयंतीच्या निमित्ताने आज श्री तुळजाभवानी देवींची भवानी तलवार अलंकार महापूजा विशेष श्रद्धेने मांडण्यात आली होती. लोकधारणेनुसार, श्री तुळजाभवानी देवीने प्रसन्न होऊन स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार प्रदान केली होती. याच ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपण्यासाठी दरवर्षी शिवजयंतीच्या दिवशी भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात येते.

आज शिवजयंतीच्या निमित्ताने भाविकांनी पहाटेपासूनच मंदिर परिसरात गर्दी केली होती. संपूर्ण मंदिर परिसर “जय भवानी, जय भवानी” च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. शिवजयंतीनिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

शिवरायांच्या विचारांचा व स्वराज्याच्या आदर्शांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने दरवर्षी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *