शिवजयंती निमित्त सोलापूर महानगरपालिकेत भव्य Blood Donation Camp संपन्न

Spread the love

Solapur : Chhatrapati Shivaji Maharaj जयंती उत्सवाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज जयंती मंडळ (सोमपा) यांच्या वतीने सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी Solapur Municipal Corporation परिसरात भव्य Blood Donation Camp चे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन माननीय उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. महेश देवकर, नगरसेवक श्री. विनोद भोसले आणि नगरसेवक श्री. सत्यजित वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बेसे व उपायुक्त आशिष लोकरे यांनी शिबिराला भेट देत Blood Donors चा उत्साह वाढवला. महापालिकेच्या परिसरात सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे आयुक्तांनी विशेष कौतुक केले.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवजन्मोत्सव मंडळाचे संस्थापक माऊली पवार, अध्यक्ष प्रभुलिंग पुजारी, सल्लागार प्रदीप जोशी तसेच सोहन माने, मेघराज साळुंखे, सौरभ सांगवे, श्रीकांत घोलप, दत्ता गायकवाड, महादेव ढेकणे, श्रीकांत भडके, श्रीनिवास रामगल, गणेश डेंगळे, विक्रम पाटील, अमृत हावळे आणि सतीश कोळी आदी पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या संदेशातून शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या Blood Donation Camp ला महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.

या उपक्रमामुळे शिवजयंती उत्सवाला सामाजिक सेवेची जोड मिळाली असून, शहरातील विविध स्तरांतून मंडळाचे कौतुक होत आहे.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

    Spread the love

    Spread the loveश्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. आज सकाळी मंदिर परिसरातील गणेश विहार येथे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया…

    वंदे मातरमच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याची दिमाखदार सांगता

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विशेष दोन दिवसीय सांस्कृतिक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *