पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सौजन्याने शिवजयंती महोत्सवानिमित्त आकर्षक सजावट व एआय-आधारित विद्युत रोषणाई

Spread the love

धाराशिव :- (प्रतिनिधी )मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यंदाच्या शिवजयंतीनिमित्त शहरात भव्य व दिमाखदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती आकर्षक सजावट व अत्याधुनिक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यावर्षीची ‘शिवशंभो’ ही संकल्पनाधारित थीम नागरिकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
दि. १० फेब्रुवारी रोजी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून साकारण्यात आलेल्या भव्य लाईटिंग शोचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. विद्युत रोषणाईची बहुरंगी उधळण, आकर्षक प्रकाशचित्रे आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे संपूर्ण आसमंत शिवमय झाला होता. या सोहळ्याने उपस्थित नागरिकांना थक्क करून टाकले.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. विविध कलावंतांनी सादर केलेल्या देशभक्तिपर व शिवचरित्रावर आधारित सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
या प्रसंगी समितीचे अध्यक्ष आकाश मिलींदराव कोकाटे यांच्यासह मार्गदर्शक प्रकाश जगताप, विश्वास शिंदे, प्रदिप साळुंके, नानासाहेब निंबाळकर, भारत कोकाटे, दत्ता बंडगर, बाळासाहेब शिंदे, पंडित मुंडे,रमेश कोकाटे, सचिन शिंदे, उमेश राजेनिंबाळकर, चंद्रसेन देशमुख, नाना घाटगे, सय्यद खलील, अंबादास दानवे, निलेश भोसले, ॲड. गजानन चौगुले, दत्ता लोकरे, युवराज कुऱ्हाडे, अझहर शेख तसेच समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिस्तबद्ध नियोजन, आकर्षक सजावट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधत यंदाचा शिवजयंती महोत्सव शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा ठरला आहे.

  • Related Posts

    संविधान उद्देशिका वाचन करुन शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीची सुरुवात

    Spread the love

    Spread the love धाराशिव :- छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यात सामाजिक समता न्याय दिन साजरा केला जातो,या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद धाराशिव,समाज कल्याण विभाग धाराशिव यांच्या…

    छत्रपती संभाजी महाराजांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *