स्पेनमधील भाविक जेवियर यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन; दहा वर्षांच्या भारतभ्रमणात ५० हजार किमी पदयात्रेचा अनोखा प्रवास

Spread the love

तुळजापूर – स्पेनच्या बार्सिलोना येथील ६६ वर्षीय भाविक जेवियर यांनी बुधवार, दिनांक ११ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले.

जेवियर हे गेल्या दहा वर्षांपासून भारतभ्रमण करत असून त्यांनी भारतातील धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरांचा सखोल अनुभव घेतला आहे. त्यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात १४ ऑक्टोबर २०१५ रोजी राजस्थानातील पुष्कर येथून केली होती. विशेष बाब म्हणजे त्यांनी ही यात्रा पदयात्रेच्या माध्यमातून पूर्ण केली असून या कालावधीत त्यांनी तब्बल ५० हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे.

या दीर्घ पदयात्रेदरम्यान जेवियर यांनी चार धाम, बारा ज्योतिर्लिंग, तसेच गंगोत्री, यमुनोत्री, लेह–लडाख, काश्मीर, कन्याकुमारी यांसह भारतातील जवळपास सर्व महत्त्वाच्या धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी देत दर्शन घेतले. भारताची अध्यात्मिक परंपरा, विविधता आणि संस्कृती यामुळे आपण अत्यंत प्रभावित झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सन २०२२ मध्ये आपली पदयात्रा पूर्ण केल्यानंतर जेवियर सध्या बस आणि रेल्वेने प्रवास करत असून भारतातील प्रमुख धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी देत आहेत. त्याच प्रवासाचा भाग म्हणून ते बुधवारी तुळजापूरात दाखल झाले होते. बुधवारी रात्री त्यांनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले.

तुळजाभवानी देवी ही शक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक असून तिचे दर्शन घेणे हे आपल्या भारतभ्रमणातील एक महत्त्वाचे अध्यात्मिक क्षण असल्याची भावना जेवियर यांनी व्यक्त केली.

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *