श्री आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२५

Spread the love

तुळजापुरात शारदीय नवरात्र महोत्सवात देवीची नित्योपचार पूजा संपन्न

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील धार्मिक विधींना भक्तिभावाने सुरुवात झाली असून,आज मंगळवार (दि. २३ सप्टेंबर) रोजी देवीची नित्योपचार पूजा संपन्न झाली.महोत्सवातील आज दुसरी माळ असून,पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती.पहाटे ६ ते सकाळी १० वाजेपर्यंत देवीची अभिषेक पूजा पार पडली.त्यानंतर देवीची आरती करण्यात आली.

दरम्यान,२६ सप्टेंबरपासून देवीच्या अलंकार पूजेला प्रारंभ होणार आहे. ललित पंचमीच्या दिवशी रथ अलंकार महापूजा होईल.त्यानंतर अनुक्रमे –
२७ सप्टेंबर : मुरली अलंकार महापूजा.२८ सप्टेंबर : शेषशायी अलंकार महापूजा.२९ सप्टेंबर : भवानी तलवार अलंकार महापूजा.३० सप्टेंबर, दुर्गाष्टमी : महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होईल.

यापूर्वी,काल (दि. २२ सप्टेंबर) रात्री १० वाजता श्री तुळजाभवानी देवीची छबिना मिरवणूक नंदी वाहनातून काढण्यात आली. या मिरवणुकीस भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सध्या तुळजापूर नगरी भक्तिभावाने उजळून निघाली असून,देशभरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीने परिसरात श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे.मंदिर प्रशासन व स्थानिक प्रशासनाकडून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *