पालकमंत्र्यांकडून श्री आई तुळजाभवानी देवींची अभिषेक पूजा

Spread the love

धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सकाळी सहकुटुंब श्री क्षेत्र तुळजापूर येथे येऊन श्री आई तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा करून देवीच्या चरणी नतमस्तक होत कुलधर्म व कुलाचारानुसार पूजा-अर्चा केली. यानंतर त्यांनी देवीची ओटी भरून आरती केली. या धार्मिक विधींमध्ये सरनाईक कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते.

पालकमंत्री सरनाईक हे दोन दिवसांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. दर्शनानंतर त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची मूर्ती अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – नांदेड येथील भाविक सचिन सैनाजी खिल्लारे यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची तुळजाभवानी देवींची मूर्ती अर्पण केली. सचिन खिल्लारे हे आज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *