बार्शी नगरपरिषदेच्या ट्रॅक्टरची चोरी

Spread the love

बार्शी नगर परिषदेकडील डास फवारणीसाठी वापरला जाणारा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरीला गेला असल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी रोहित बापू लंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रॅक्टर गाडेगाव रोडवरील चांदणी फिल्टर येथे लावण्यात आला होता.

दि. ९ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत ट्रॅक्टरने फवारणी करून वाहन चालक रूपेश लोंढे याने ट्रॅक्टर ठरलेल्या ठिकाणी लावला होता. मात्र, दि. १० जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता तेथे ट्रॅक्टर न दिसल्याने चोरीचा संशय बळावला. या घटनेची तातडीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांसह तपासणी केली असता, ट्रॅक्टर कोणालाही पाठविण्यात आला नसल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी रोहित लंगडे यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गेल्या काही महिन्यात बार्शी नगर पालीकेच्या साहित्यांची चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून दि २२ ते २४ जूनच्या दरम्यानही चांदनी फिल्टर येथे लावण्यात आलेल्या नगरपालिकेच्या टिप्परच्या बॅटरीची चोरी झाली होती. यानंतर आता चक्क येथे लावण्यात आलेल्या ट्रॅक्टरवरच चोरटयांने डल्ला मारल्याने नगर परिषद साहित्याच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे.

  • Related Posts

    स्वातंत्र्याच्या लढ्यातून मिळालेली जिद्दच आजच्या संकटावर मात करण्याची ताकदपालकमंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveमराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा धाराशिवकरांना दुष्काळाच्या संभाव्य संकटाला धैर्याने सामोरे जाण्याचे आवाहन धाराशिव – मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी प्रतिकूल परिस्थितीत दाखविलेली जिद्द,त्याग आणि…

    बीड – मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

    Spread the love

    Spread the loveबीड – मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांनी राज्यातील १३ कोटी जनतेच्या वतीने मुक्तीसंग्रामातील हुतात्मा वीर व…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *