बीड – मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

Spread the love

बीड – मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांनी राज्यातील १३ कोटी जनतेच्या वतीने मुक्तीसंग्रामातील हुतात्मा वीर व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले तसेच तेलंगणा व कर्नाटक मुक्तीसाठी योगदान देणाऱ्या वीरांनाही त्यांनी वंदन केले. मराठवाड्याच्या लढ्यात बीड आणि अंबेजोगाईचा मोठा वाटा राहिला असून, या ऐतिहासिक भूमीचा चेहरामोहरा बदलून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. बीड जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, सांस्कृतिक व क्रीडा प्रकल्पांना गती दिल्याचे सांगत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावाही त्यांनी घेतला. मुक्तीसंग्रमादिनाच्या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान शासकीय कार्यक्रमापूर्वी त्यांनी हुतात्मा स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली. तसेच उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आमदार विजयसिंह पंडित, नगराध्यक्ष प्रेमलता पारवे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत आदी उपस्थित होते.

आपले वडील दिवंगत बाजीराव पाटील हे स्वतः या संग्रामात मुक्तीसैनिक म्हणून सहभागी झाले होते, हा आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हा लढा राजकीय स्वातंत्र्यासह शिक्षण, स्वाभिमान व लोकशाही मूल्यांसाठी होता. हा इतिहास केवळ स्मरण करण्यापुरता नसून पुढील पिढीला प्रेरणा देणारा आहे. आज पुण्याला जाणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे नूतनीकरण आणि मुलांना विज्ञानाची ओळख करून देणाऱ्या अत्याधुनिक तारांगणाचे आज भूमिपूजन होणार आहे. अल-निनोच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला आवश्यक पाहणीच्या सूचना दिल्या असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे ६७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४९१ कोटी रुपये जमा करून सातबारा कोरा करण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ११ हजारांपेक्षा अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाले असून हैदराबाद गॅझेटवर आधारित ५५४ अर्जांवर १०० टक्के कारवाई पूर्ण झाली आहे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

  • Related Posts

    स्वातंत्र्याच्या लढ्यातून मिळालेली जिद्दच आजच्या संकटावर मात करण्याची ताकदपालकमंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveमराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा धाराशिवकरांना दुष्काळाच्या संभाव्य संकटाला धैर्याने सामोरे जाण्याचे आवाहन धाराशिव – मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी प्रतिकूल परिस्थितीत दाखविलेली जिद्द,त्याग आणि…

    क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा तर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *