अनाधिकृत वैद्यकिय व्यावसायीक (बोगस डॉक्टर) शोध समितीजिल्हास्तरीय (ग्रामीण) तपासणी अहवालसादर

Spread the love

धाराशिव – जिल्हयात वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना देखील बोगस डॉक्टर रुग्णालय थाटुन व सर्व सामान्य जनतेस डॉक्टर आहे असे सांगुन सामान्य उपचार करत आहेत. त्यामुळे बोगस डॉक्टरांकडुन नागरीकांच्या जिवाशी खेळ,बोगस डॉक्टरचा सुळसुळाट अशा मथळयाच्या बातम्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित होत होत्या.

त्या अनुशंषाने जिल्हा आरोग्य प्रशासनाने वेळीच खबरदारी घेवुन जिल्हयातील बोगस डॉक्टरांचा शोध घेवुन त्यांच्यावर तात्काळ कार्यावाही करण्यासाठी अनाधिकृत वैद्यकिय व्यावसायीक (बोगस डॉक्टर) शोध समिती जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती.

जिल्हा,तालुका,नगरपालीका व नगर परिषद स्तरावर शासन नियमानुसार समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहे.तालुकास्तरावर अध्यक्ष म्हणुन गटविकास अधिकारी,सदस्य सचिव म्हणुन तालुका आरोग्य अधिकारी व सदस्य म्हणुन विस्तार अधिकारी, (आरोग्य) पंचायत समिती तसेच शहरी भागाकरिता वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा/ग्रामिण रुग्णालय मार्फत शासन निर्णयानुसार बोगस डॉक्टरवर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते.त्यानुसार आपल्‍या कार्याक्षेत्रातील बोगस वैद्यकीय व्‍यावसायिकांचा शोध घेवुन तात्काळ शासन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश आजच्या बैठकीत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यानी दिले होते.तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास यांनी जिल्हयातील बोगस वैद्यकीय व्‍यावसायिकांचा शोध घेण्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र,सर्व समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र,सर्व आरोग्य कर्मचारी व ग्रामविस्तार अधिकारी यांना आपल्या कार्याक्षेत्रातील बोगस वैद्यकीय व्‍यावसायिक आढळुन आल्यास प्रशासनास तात्‍काळ माहिती देण्याचे आदेश देण्यात आले होते.

ग्रामीण भागामध्ये आरोग्य कर्मचारी व आशा स्वंयसेविका यांच्या गृहभेटी दरम्यान गावामध्ये बोगस वैद्यकीय व्‍यावसायिक आढळून आल्यास वैद्यकिय अधिकारी यांना कळविण्या बाबत सुचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार ३१ डिसेंबर ते ७ जानेवारी २०२५ या कालावधीत जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व वैद्यकीय व्‍यावसायिकाची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये तपासलेले एकूण वैद्यकीय व्‍यावसायिकाची संख्या ४४१ असून योग्य अर्हता असलेले वैद्यकीय व्‍यावसायिकाची संख्या ३४१ आहे.तपासणीमध्ये त्रुटी आढळून आलेल्या वैद्यकीय व्‍यावसायिकाची संख्या १५८ असून तपासणी वेळी बंद दवाखाना संख्या ७९ होती.तपासणीमध्ये त्रुटी आढळून आलेल्या वैद्यकीय व्‍यावसायिकाना त्रुटीची पूर्तता करणेसाठी समितीमार्फत नोटीस देऊन त्रुटीची पूर्तता करणेसाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.जे तपासणी वेळी बंद दवाखाने होते त्यांची पुनर्तपासणी होणार असून बोगस वैद्यकीय व्‍यावसायिक आढळून आल्यास त्यांचेवर नियमानुसार योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. मोहीम संपूर्ण वर्षभर राबवली जाणार असल्याने बोगस वैद्यकीय व्‍यावसायिकवर निर्बंध येणार आहेत.

  • Related Posts

    क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा तर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग…

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *