सेवा संकल्प अभियानातून वीज योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत

Spread the love

कळंब तहसील कार्यालयात महावितरणचा माहिती स्टॉल; सौर रूफटॉप,पीएम सूर्यघर योजनेसह विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती

धाराशिव – घराच्या छतावर सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मितीची संधी,शासनाच्या विविध वीजविषयक योजनांचा लाभ कसा घ्यावा आणि दैनंदिन जीवनात विजेचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यावी,याची माहिती आता नागरिकांना थेट एकाच ठिकाणी मिळत आहे.सेवा संकल्प अभियानाअंतर्गत कळंब तहसील कार्यालयात महावितरणच्या वतीने उभारण्यात आलेल्या माहिती स्टॉलमुळे विविध योजना आणि सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला.

आज दि.६ ऑक्टोबर २०२६ रोजी कळंब तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियानाअंतर्गत महावितरणचा विशेष माहिती स्टॉल उभारण्यात आला.या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांना सोलर रूफटॉप योजना,प्रधानमंत्री सूर्यघर योजना (PM Surya Ghar Yojana),स्मार्ट योजना (SMART Scheme) तसेच महावितरणच्या विविध सुरू असलेल्या योजना आणि सेवांची माहिती देण्यात आली.यावेळी कळंब तहसीलदार खोकले यांनी सेवा संकल्प अभियानच्या स्टॉलला भेट देऊन महावितरणकडून सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व सेवांची माहिती जाणून घेतली.

महावितरणच्या धाराशिव विभागांतर्गत कळंब उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता जयंत लढे यांनी तहसीलदार श्री.खोकले तसेच उपस्थित नागरिकांना विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये स्मार्ट योजना,पीएम सूर्यघर योजना (PMSGMBY),सोलर रूफटॉप योजना यांसह महावितरणच्या अन्य सेवा व योजनांचा समावेश होता.

विशेषतः विद्युत उपकरणे हाताळताना घ्यावयाची काळजी,विजेचा सुरक्षित वापर,अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी आणि विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने पाळावयाच्या उपाययोजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.या उपक्रमात भरत निंगुळे (AA), सौरभ टाकरखडे (AE) आणि येरमाळा येथील शंकर तम्माना (AE) यांनी उपस्थित राहून स्टॉलला भेट देणाऱ्या नागरिकांना विविध योजना,सेवा आणि विद्युत सुरक्षेबाबत माहिती दिली.

नागरिकांच्या दारापर्यंत सेवा पोहोचविणारा उपक्रम
वीज ही आज केवळ घर उजळविणारी सुविधा राहिलेली नसून कुटुंबाच्या दैनंदिन जीवनापासून शेती,शिक्षण,व्यवसाय आणि रोजगारापर्यंत प्रत्येक क्षेत्राशी जोडली गेली आहे.त्यातच सौरऊर्जेचा वापर वाढवून पारंपरिक विजेवरील अवलंबित्व आणि वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना महत्त्वपूर्ण ठरत आहेत.

  • Related Posts

    मंचकी निद्रेने श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज सायंकाळी श्री तुळजाभवानी देवींच्या मंचकी निद्रेने प्रारंभ झाला. सायंकाळी अभिषेक पूजा झाल्यानंतर श्री तुळजाभवानी देवी शेजगृहातील पलंगावर…

    टंचाईच्या पार्श्वभूमीवर भूजल विभागाचे निर्देश

    Spread the love

    Spread the loveमहाराष्ट्र भूजल अधिनियमाच्या कलमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना धाराशिव – खरीप हंगाम २०२६ मधील पहिल्या कळेत दुष्काळी परिस्थिती घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा विचार करता…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *