दुष्काळग्रस्त घोषित २६५ तालुक्यांपुरते नियोजन मर्यादित न ठेवता सर्व ३५८ तालुक्यांतील परिस्थितीचा विचार करून अंगणवाडीतील पोषण आहार व पाणीपुरवठा, स्थलांतरित कुटुंबांतील बालकांची सुरक्षित निवासव्यवस्था आणि बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हा व तालुका यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

Spread the love

दुष्काळग्रस्त घोषित २६५ तालुक्यांपुरते नियोजन मर्यादित न ठेवता सर्व ३५८ तालुक्यांतील परिस्थितीचा विचार करून अंगणवाडीतील पोषण आहार व पाणीपुरवठा, स्थलांतरित कुटुंबांतील बालकांची सुरक्षित निवासव्यवस्था आणि बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हा व तालुका यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

तालुकानिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन एकत्रित कृती आराखडा तयार करावा, तसेच स्थलांतरित कामगारांच्या बालकांसाठी शासकीय वसतिगृहे व बालगृहांमध्ये आवश्यक निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

दुष्काळी परिस्थितीत #अंगणवाडी केंद्रांना पुरेसा पाणीपुरवठा होणे आवश्यक असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेल्या भागांत अंगणवाडी केंद्रांनाही आवश्यक प्रमाणात पाणी मिळेल, याची दक्षता घेण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले. दुष्काळाच्या काळात बालविवाहाची शक्यता वाढू शकते. त्यामुळे दुष्काळग्रस्त व स्थलांतरित भागांतील महिला आणि कुटुंबांशी थेट संपर्क साधून बालविवाह प्रतिबंध, बालसंरक्षण व्यवस्था आणि शासनाच्या उपलब्ध योजनांबाबत जनजागृती करावी, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.

स्थलांतरित कुटुंबांतील बालकांसाठी उपलब्ध बालगृहे, बालसंगोपन केंद्रे व वसतिगृहांची क्षमता, अन्नसाठा, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांचा आढावा घेऊन आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले. आवश्यकतेनुसार स्वयंसेवी संस्था व सीएसआरच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून घ्यावी. बंद असलेल्या वसतिगृहांची कारणे व संबंधित तक्रारींची पडताळणी करून मूलभूत सुविधांची तपासणी केल्यानंतरच बालकांना तेथे दाखल करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीस आयुक्त वर्षा लड्डा, एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवाडे, उपायुक्त जे. बी. गिरासे, उपायुक्त वर्षा पवार, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिव वंदना जैन उपस्थित होते.

  • Related Posts

    सेवा संकल्प अभियानांतर्गत ८ ऑक्टोबरला सायकल व ई-बाईक रॅली

    Spread the love

    Spread the loveनागरिकांना सहभागाचे आवाहन धाराशिव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसेच त्यांच्या कार्यकाळात ‘सेवा परमो धर्मः’ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय…

    कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमजिल्ह्यात विशेष सर्वेक्षण मोहीम ३१ ऑक्टोबरपर्यंत ३८६ गावे व शहरी भागात घरोघरी तपासणी

    Spread the love

    Spread the love५ लाख ८५ हजार ८५९ नागरिकांची होणार तपासणी ; २१ हजार ३४१ सहवासितांची विशेष तपासणी धाराशिव – राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सन २०२७ पर्यंत ‘कुष्ठरोग संक्रमण शून्यावर’ आणण्याच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *