पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास बंदी

Spread the love

शासकीय कर्तव्यावरील अधिकारी- कर्मचारी व बँक सुरक्षा व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांना अपवाद

धाराशिव – विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील नगर परिषद हद्दीत परवानाधारक व्यक्तींना परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,२०२३ च्या कलम १६३ अन्वये याबाबत आदेश जारी केला आहे.हा आदेश निर्गमित झाल्याच्या तारखेपासून ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अंमलात राहील.

भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ चा कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशात दिलेल्या निर्देशानुसार कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने निवडणूक घोषित झाल्यापासून निवडणुकीचे निकाल घोषित होईपर्यंत परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.हे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी लागू केले आहे.

त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,२०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती,दंडाधिकारी शक्ती प्रदान करण्यात आलेले अधिकारी-कर्मचारी तसेच बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी- कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त अन्य सर्व परवानाधारक व्यक्तींना परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास बंदी घातली आहे.हा आदेश जिल्ह्यातील नगर परिषद हद्दीत आदेश निर्गमित झाल्याच्या तारखेपासून ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अंमलात राहणार आहे.

  • Related Posts

    ठाकरेनगर नवरात्र महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर; २६ ऑक्टोबरला भव्य मिरवणूक

    Spread the love

    Spread the loveनागालँड येथील अघोरींचा नयनरम्य कार्यक्रम; ‘खेळ पैठणीचा’सह डान्स स्पर्धेचे आयोजन धाराशिव (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे यंदाही धाराशिव शहरातील ठाकरेनगर येथे नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध…

    अवैध दारू विक्रीची माहिती तात्काळ पोलिसांना द्या

    Spread the love

    Spread the loveपदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटलांना सतर्कतेच्या सूचना धाराशिव – विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील अवैध दारू…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *