दुधाळवाडीत पशुपालकांना थेट गोठ्यावर मार्गदर्शन

Spread the love

‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत पशुसंवर्धन योजनांचे मार्गदर्शन शिबिर ; पशुधन विम्यासह चारा टंचाईच्या नियोजनावर भर

धाराशिव – दुष्काळजन्य परिस्थितीत पशुधनासाठी पुरेसा चारा कसा उपलब्ध करायचा, उपलब्ध चाऱ्याचे नियोजन कसे करायचे आणि अचानक होणाऱ्या पशुधनाच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण कसे मिळवायचे, अशा पशुपालकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांना थेट त्यांच्या गोठ्यावर जाऊन उत्तरे देण्यात आली.

‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत पशुवैद्यकीय चिकित्सालय, येरमाळा,ता.कळंब अंतर्गत मौजे दुधाळवाडी येथे आज,दि.३० सप्टेंबर रोजी पशुसंवर्धन विषयक विविध योजनांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.

शिबिरात तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी,कळंब डॉ.गायके यांनी पशुपालकांना पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये पशुधन विमा योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना आणि VMDDP योजना यांची माहिती देण्यात आली.त्याचबरोबर सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्माण होऊ शकणाऱ्या चारा टंचाईचे नियोजन कसे करावे, याबाबतही पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरात विशेषतः ‘पशुधन विमा योजने’चे महत्त्व पशुपालकांना समजावून सांगण्यात आले. पशुधन हे ग्रामीण कुटुंबांच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा आधार असल्याने जनावरांना विम्याचे संरक्षण असणे आवश्यक आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांचा विमा काढण्यासाठी नोंदणी करावी,याबाबत डॉ.गायके यांनी मार्गदर्शन केले.

सध्या दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन केवळ शिबिरातील मार्गदर्शनापुरते मर्यादित न राहता पशुपालकांच्या गोठ्यांवर प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या.दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर कसा करावा, जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन कोणत्या पद्धतीने करावे,याची माहिती पशुपालकांना प्रत्यक्ष देण्यात आली.

यावेळी पशुपालकांनी पशुधन संगोपन,चारा व्यवस्थापन आणि विविध योजनांबाबत उपस्थित केलेल्या शंकांचेही निरसन करण्यात आले.त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच दुष्काळाच्या काळात पशुधनाची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेले व्यावहारिक मार्गदर्शन थेट पशुपालकांच्या गोठ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम या शिबिरातून करण्यात आले.

  • Related Posts

    निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी विहित वेळेत पार पाडाजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    Spread the love

    Spread the loveऔरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा बैठक धाराशिव – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि…

    भटके-विमुक्त कागदपत्रे अभियानाला परंड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद ; तीन दिवसांत ४७१ सेवा व कागदपत्रांची कार्यवाही

    Spread the love

    Spread the loveविविध प्रमाणपत्रे,शासकीय योजना व सेवांसाठी नागरिकांना एकाच ठिकाणी मार्गदर्शन धाराशिव – शासकीय योजनांचा लाभ घेण्याची इच्छा आहे,मात्र त्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांची पूर्तता कशी करायची,अर्ज कुठे करायचा, कोणत्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *