मराठा आरक्षण आंदोलनातील सक्रिय तरुण विलास शिनगारे यांचा मृत्यू; खामगाव परिसरात हळहळ,

Spread the love

धाराशिव | विश्व प्रशांत न्यूज.

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाची धग राज्यभर पोहोचत असतानाच धाराशिव तालुक्यातील खामगाव येथील विलास सुरेश शिनगारे (वय ३०) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विलास यांच्या मृत्यूचा संबंध मराठा आरक्षण आंदोलनामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावाशी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मात्र, या कारणाची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

विलास शिनगारे हे व्यवसायाने मोटार मेकॅनिक होते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. तसेच मुंबईतील आंदोलनासह स्थानिक पातळीवरील सभा, बैठका आणि विविध आंदोलनांमध्येही ते सहभागी झाले होते.

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होत असताना आणि सरकारकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असतानाच ही घटना घडल्याने मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. आज मराठा संघटनांकडून धाराशिव बंदची हाक देण्यात आलेली असतानाच विलास यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने आंदोलनाला आणखी भावनिक पार्श्वभूमी मिळाली आहे.

विलास यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ-भावजय आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेचे नेमके कारण अधिकृत तपासातून स्पष्ट होणे आवश्यक असून, कोणत्याही निष्कर्षापूर्वी प्रशासनाच्या तपासाची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे. मात्र, या घटनेने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाची गंभीरता आणि समाजातील अस्वस्थता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

  • Related Posts

    आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासात माध्यमांची भूमिका महत्त्वाची,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    Spread the love

    Spread the loveपीआयबीच्या ‘वार्तालाप’ माध्यम परिषदेत शाश्वत शेतीवर मंथन,अणुतंत्रज्ञानापासून मधुमक्षिकापालनापर्यंत विविध पर्यायांची माहिती धाराशिव – शेतीसोबत कुक्कुट,शेळीपालन, मधुमक्षिकापालनासारख्या पूरक व्यवसायांची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.त्यासाठी शाश्वत आणि सर्वसमावेशक…

    शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदर्शन महत्त्वाचे माध्यम,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    Spread the love

    Spread the loveधाराशिवमध्ये दोन दिवसीय मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाला सुरुवात शासकीय योजनांपासून आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीपर्यंत माहिती ; पोषण आहार,भरडधान्यांसाठी विशेष दालन धाराशिव – केंद्र आणि राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *