कालकथीत मेजर दशरथ गजधने यांच्या स्मृतिदिनानिमित्त अन्नदान

Spread the love

धाराशिव : धाराशिव येथील कालकथीत मेजर दशरथ गजधने यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अन्नपूर्णा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शासकीय रुग्णालयासमोरील रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले.कालकथीत मेजर दशरथ गजधने हे काँग्रेस शहर कार्याध्यक्ष संजय गजधने यांचे वडील होते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गजधने परिवाराच्या वतीने हा अन्नदान उपक्रम राबविण्यात आला.शासकीय रुग्णालयासमोर अन्नपूर्णा सामाजिक संस्थेच्या वतीने दररोज आपापल्या नातेवाइकांच्या वतीने विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या

वाढदिवस, स्मृतिदिन,सण, उत्सव तसेच अन्य विशेष दिवसांच्या निमित्ताने रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान केले जाते. या उपक्रमातून गरजू नागरिकांना आधार देण्याचे कार्य अन्नपूर्णा संस्थेच्या वतीने सातत्याने सुरू आहे.यावेळी काँग्रेस शहर कार्याध्यक्ष संजय गजधने,काँग्रेस शहराध्यक्ष धनंजय राऊत, सुरक्षा समिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिवचे सदस्य अब्दुल लतीफ,गणेश वाघमारे,बलभीम कांबळे, रमेश पाटील, अनुरथ गजधने,तसेच अन्नपूर्णा सामाजिक संस्थेचे अतुल अजमेरा, हरीश सारडा,श्री सारडा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

  • Related Posts

    तगर भूमी जेतवन बुद्ध विहारात वर्षावास महोत्सवाचे आयोजन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्षावास निमित्त निसर्गाच्या सानिध्यात तगर भुमी जेतवन बुद्ध विहार,गडदेवदरी परिसर,धाराशिव येथे वर्षावास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मौजे गडदेवदरी घाटंग्री परिसर ता.जि.धाराशिव येथे तीन…

    ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

    Spread the love

    Spread the loveईद-ए-मिलाद निमित्त नगरसेवक अझहर मुजावरांचा उपक्रम; एसीएम ग्रुपच्या रक्तदान शिबिरात २००-३०० युवकांचा सहभाग धाराशिव – “पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.)” यांच्या जन्मदिनी साजरा केला जाणारा ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांसाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *