हरित धाराशिव अभियानात पर्यटन विकास समिती सह इतर संस्था समितीचा सहभाग .

Spread the love

धाराशिव : हरित धाराशिव अभियानात पर्यटन विकास समिती, फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समिती, मतदार जनजागरण समिती आणि राजर्षी शाहू बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सहभागी झाल्या,धाराशिव जिल्ह्यात एकाच वेळी दहा लाख वृक्षलागवड करण्याच्या उपक्रमांतर्गत हा

कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ.किर्ती किरण पुजार व अभिनेते तथा पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांच्यासोबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे अध्यक्ष गणेश रानबा वाघमारे यांनी जिल्हाधिकारी डॉ. किर्ती किरण पुजार यांच्या पर्यावरण

संवर्धन व सामाजिक कार्याचे सयाजी शिंदे यांच्याजवळ कौतुक केले. धाराशिव जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.धाराशिव जिल्ह्यात एकाच वेळी दहा लाख वृक्षलागवडीचा उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाची मोठी जनचळवळ उभी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.हरित धाराशिव अभियानाची ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार,वृक्षारोपणासोबतच लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे,प्रा.अभिमान हंगरगेकर, गणेश वाघमारे,संजय गजधने, प्रविण जगताप,बलभीम कांबळे,रमेश पाटील,उज्वला शिंदे,ज्योती राजेनिंबाळकर यांच्यासह विविध संस्था,जिल्हा प्रशासन,नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Related Posts

    तगर भूमी जेतवन बुद्ध विहारात वर्षावास महोत्सवाचे आयोजन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्षावास निमित्त निसर्गाच्या सानिध्यात तगर भुमी जेतवन बुद्ध विहार,गडदेवदरी परिसर,धाराशिव येथे वर्षावास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मौजे गडदेवदरी घाटंग्री परिसर ता.जि.धाराशिव येथे तीन…

    ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

    Spread the love

    Spread the loveईद-ए-मिलाद निमित्त नगरसेवक अझहर मुजावरांचा उपक्रम; एसीएम ग्रुपच्या रक्तदान शिबिरात २००-३०० युवकांचा सहभाग धाराशिव – “पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.)” यांच्या जन्मदिनी साजरा केला जाणारा ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांसाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *