स्व. शंकरराव रंगनाथ फुगारे (साळुंके) सर यांच्या स्मरणार्थ आयोजित

Spread the love

आळणी मिनी मॅरेथॉन २०२६

दिनांक : १६ ऑगस्ट २०२६
आळणी मिनी मॅरेथॉन २०२६ ही स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाली. या मॅरेथॉनला विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद, क्रीडाप्रेमी ,मान्यवर आणि ग्रामस्थांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्हाला मनापासून आनंद व समाधान वाटले.
सकाळी ६.०० वाजण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी व पालक उपस्थित झाले होते. विद्यार्थ्यांमधील उत्साह, जिद्द, शिस्त आणि क्रीडाभावना खरोखरच कौतुकास्पद होती.
या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी सकाळी उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर, शिक्षकवृंद, छावा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य यांचे मनःपूर्वक आभार.
ग्रामस्थांचे विशेष आभार
आळणीतील ग्रामस्थांनी या मॅरेथॉनला दिलेला प्रतिसाद अविस्मरणीय होता. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांचा कडकडाट, घोषणाबाजी आणि प्रोत्साहनाच्या शब्दांनी सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्याचे काम ग्रामस्थांनी केले.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाची असलेली धडपड पाहून ही मॅरेथॉन संपूर्ण आळणी गावाची मॅरेथॉन आहे, याची जाणीव झाली.
पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार
मॅरेथॉनदरम्यान पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून सुरक्षितता आणि संपूर्ण रूटवरील नियोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.

पोलीस प्रशासनाच्या या सहकार्याबद्दल आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद!

आरोग्य विभागाचे विशेष आभार
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, आळणी येथील मॅडम व सर्व कर्मचारी उपस्थित राहिले. रूटवर प्राथमिक तपासणी व आवश्यक आरोग्यसेवेची व्यवस्था करून त्यांनी अत्यंत जबाबदारीने सहकार्य केले. त्यांच्या या योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार.

स्वयंसेवक व ज्येष्ठ क्रीडाप्रेमींचे आभार
मॅरेथॉनच्या संपूर्ण आयोजनामध्ये सर्व Volunteers, ज्येष्ठ क्रीडाप्रेमी आणि मार्गदर्शकांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे, रूटवरील व्यवस्था पाहणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
मॅरेथॉन तसेच बक्षीस वितरण कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा, कार्यक्रमातील विविध टप्प्यांची माहिती आणि उपस्थितांचे योग्य पद्धतीने मार्गदर्शन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सूत्रसंचालन श्री. दादासाहेब गायकवाड व श्रीमती स्वाती मालोजीराजे निंबाळकर यांनी अत्यंत सुंदर, प्रभावी आणि उत्साहपूर्ण पद्धतीने पार पाडले.
कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री. बबन काकडे यांनी केले, तर साऊंड सिस्टिम व मंडप व्यवस्था श्री. काका लोमटे यांनी सांभाळली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आळणी गावातील फुगारे परिवार, आळणी ग्रामस्थ आणि गावातील सामाजिक कार्य करणारे मंडळ ‘छावा प्रतिष्ठान आळणी ग्रुप’ च्या सर्व सदस्यांनी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून विशेष परिश्रम घेतले.

विजेत्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन🏆
गट क्र. १ – इयत्ता २ री ते ४ थी (मुले)
प्रथम क्रमांक : कु. जगजीत मालोजी राजेनिंबाळकर
द्वितीय क्रमांक : कु. सोमनाथ वसंत माळी
तृतीय क्रमांक : कु. प्रणित पवन माळी
गट क्र. १ – इयत्ता २ री ते ४ थी (मुली)
प्रथम क्रमांक : कु. स्वरा अमरसिंह फुगारे
द्वितीय क्रमांक : कु. स्वरा राहुल माळी
तृतीय क्रमांक : कु. आरोही सतीश कदम

🔵 गट क्र. २ – इयत्ता ५ वी ते ७ वी (मुले)
🥇 प्रथम क्रमांक : कु. प्रसाद नितीन तांबे
🥈 द्वितीय क्रमांक : कु. यश वैभव पवार
🥉 तृतीय क्रमांक : कु. सौरव किरण वीर
🟠 गट क्र. २ – इयत्ता ५ वी ते ७ वी (मुली)
🥇 प्रथम क्रमांक : कु. पौर्णिमा रमाकांत डोलारे
🥈 द्वितीय क्रमांक : कु. स्वाती लिंबराज तोडकर
🥉 तृतीय क्रमांक : कु. योगिता राजाराम राठोड

🔴 गट क्र. ३ – इयत्ता ८ वी ते १० वी (मुले)
🥇 प्रथम क्रमांक : कु. अथर्व भिमराव धुमाळ
🥈 द्वितीय क्रमांक : कु. सार्थक किरण वीर
🥉 तृतीय क्रमांक : कु. विश्वजित रणजित वीर
🛑गट क्र. ३ – इयत्ता ८ वी ते १० वी (मुली)
🥇 प्रथम क्रमांक : कु. आरती नागेश क्षीरसागर
🥈 द्वितीय क्रमांक : कु. पायल विजय नांदे
🥉 तृतीय क्रमांक : कु. साक्षी धनंजय बामणे

सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने नियमांचे पालन करून उत्साहाने सहभाग नोंदविला व उल्लेखनीय कामगिरी केली. विजेता होणे निश्चितच अभिमानाची बाब आहे; परंतु स्पर्धेत सहभागी होण्याची तयारी, धावण्याची जिद्द, शिस्त आणि प्रयत्न हीच खरी विजयाची सुरुवात आहे.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
विजेत्या विद्यार्थ्यांना तसेच मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन प्रमाणपत्र लवकरच त्यांच्या शाळेत देण्यात येणार आहेत.

दैदिप्यमान बक्षीस वितरण सोहळा

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.धर्मराज कल्याणराव वीर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. प्रमोद नेताजीराव वीर उपस्थित होते.याप्रसंगी आळणी गावचे तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, लाईन मॅन आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कार्यक्रमाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाचे कर्मचारी देखील आवर्जून उपस्थित होते. तसेच जीवनराव गोरे माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा आळणी येथील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. या क्रीडा महोत्सवाला आळणी गावातील सर्व मित्र मंडळांचे सदस्य, क्रीडाप्रेमी नागरिक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मॅरेथॉननंतर आयोजित करण्यात आलेला बक्षीस वितरण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि दैदिप्यमान वातावरणात संपन्न झाला. विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान, पालकांचा आनंद आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हे या संपूर्ण उपक्रमाचे सर्वात मोठे यश ठरले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविणाऱ्या सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार.
आपले सहकार्य हेच आमचे बळ!
ही मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार.
विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, छावा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य, स्वयंसेवक, ज्येष्ठ क्रीडाप्रेमी,सर्व नेतेमंडळी, सर्व मित्र मंडळ,मान्यवर आणि सर्व सहकार्य करणाऱ्या व्यक्तींमुळेच आळणी मिनी मॅरेथॉन यशस्वी होऊ शकली.
आपला सहभाग, आपले सहकार्य आणि विद्यार्थ्यांना दिलेले प्रोत्साहन हेच आमच्यासाठी सर्वात मोठे बळ आहे.
पुढील वर्षीही यापेक्षा अधिक उत्साहाने, अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने आणि अधिक भव्य स्वरूपात आळणी मिनी मॅरेथॉन आयोजित करण्याचा आमचा संकल्प आहे.
आपले मनःपूर्वक आभार

  • Related Posts

    तगर भूमी जेतवन बुद्ध विहारात वर्षावास महोत्सवाचे आयोजन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्षावास निमित्त निसर्गाच्या सानिध्यात तगर भुमी जेतवन बुद्ध विहार,गडदेवदरी परिसर,धाराशिव येथे वर्षावास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मौजे गडदेवदरी घाटंग्री परिसर ता.जि.धाराशिव येथे तीन…

    ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

    Spread the love

    Spread the loveईद-ए-मिलाद निमित्त नगरसेवक अझहर मुजावरांचा उपक्रम; एसीएम ग्रुपच्या रक्तदान शिबिरात २००-३०० युवकांचा सहभाग धाराशिव – “पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.)” यांच्या जन्मदिनी साजरा केला जाणारा ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांसाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *