शिबिरातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ द्या,जिल्हाधिकारी ,कीर्ती किरण पुजार

Spread the love

शिबिरातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ द्या,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

धाराशिव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरांद्वारे विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,अपर पोलिस अधीक्षक श्री.पांडकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले की,२२ जुलै रोजी उमरगा,२४ जुलै रोजी धाराशिव विधानसभा मतदारसंघासाठी शिराढोण येथे,२६ जुलै रोजी तुळजापूर येथे आणि २ ऑगस्ट रोजी भूम येथे शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी ही शिबिरे होणार असून, प्रत्येक विभागाने आपल्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांना याच ठिकाणी उपलब्ध करून द्यावा.यासाठी सर्व विभागांनी आतापासूनच योजनानिहाय लाभार्थ्यांच्या याद्या अंतिम कराव्यात.आरोग्य विभागाने आयुष्मान कार्ड,भूमी अभिलेख विभागाने स्वामित्व सनद,तर कामगार विभागाने ई-श्रम कार्ड शिबिरस्थळीच तयार करून मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरित करावेत.तसेच आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचेही आयोजन याच कार्यक्रमांतर्गत करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

२२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या शिबिरांसाठी संबंधित विधानसभा मतदारसंघांतील तालुकानिहाय लाभार्थ्यांच्या याद्या तयार करून विविध विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे.शिबिरातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळेल,यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,असेही त्यांनी स्पष्ट केले.याशिवाय प्रत्येक विभागाने आपल्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र माहिती स्टॉल उभारावेत.स्टॉलवर माहितीपत्रके,घडीपुस्तिका आणि योजनांशी संबंधित साहित्य उपलब्ध करून देऊन शिबिरात येणाऱ्या नागरिकांना त्याचे वितरण करावे.यामुळे भविष्यात विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आवश्यक माहिती सहज उपलब्ध होईल,

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *