अधिक मास व उन्हाळी सुट्टीनिमित्त तुळजाभवानी मंदिरातील पूजेच्या वेळेत बदल

Spread the love

तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिरात अधिक मास व उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी पूजेच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासन विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिर सूचनेनुसार, दि. ८ जून २०२६ (सोमवार) ते १४ जून २०२६ (रविवार) या कालावधीत श्रीदेवींचे चरणतीर्थ रात्री १.०० वाजता होणार असून सकाळची पूजेची घाट ६.०० वाजता पार पडणार आहे.

मंदिरातील महंत, पुजारी, सेवेकरी तसेच भाविक भक्तांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भाविकांना दर्शनासाठी होणारी गैरसोय टाळणे व वाढत्या गर्दीचे सुयोग्य नियोजन करणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ही सूचना तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *