श्री आई  तुळजाभवानी देवींचरणी राजकुमार देशमुख यांची एक लाख रुपयांची देणगी

Spread the love

तुळजापूर – सातारा जिल्ह्यातील खटाव येथील राजकुमार आनंदराव देशमुख यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक लाख रुपयांची देणगी अर्पण केली.

राजकुमार आनंदराव देशमुख हे आपल्या पत्नी गोदावरी देशमुख यांच्यासमवेत श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी एक लाख रुपयांची देणगी अर्पण केली.

यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने राजकुमार देशमुख व गोदावरी देशमुख या दांपत्यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा आणि महावस्त्र भेट देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर, रविराज गायकवाड तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *