श्री आई तुळजाभवानी मंदिर परिसरात कोटपा कायद्याअंतर्गत २४ जणांवर दंडात्मक कारवाई

Spread the love

तुळजापूर – श्री आई तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व तंबाखूजन्य पदार्थ सोबत बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मंगळवार दिनांक १४ एप्रिल रोजी कोटपा (COTPA) कायद्याअंतर्गत विशेष धाड सत्र राबविण्यात आले. कोटपा (Cigarettes and Other Tobacco Products Act, 2003) हा तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने लागू केलेला कायदा असून, तो १ मे २००४ पासून अंमलात आहे. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी, अल्पवयीन मुलांना तंबाखू विक्रीवर मनाई तसेच शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्रीस प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

या मोहिमेदरम्यान कोटपा कायद्याच्या कलम ४, कलम ६ (A) व कलम ६ (B) अन्वये एकूण २४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये मंदिर परिसरातील २२ व मंदिर प्रशासकीय इमारतीतील २ अशा एकूण २४ व्यक्तींचा समावेश असून, त्यांच्याकडून एकूण ४,६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या कारवाईत डॉ. विक्रांत राठोड (जिल्हा सल्लागार, NTCP), श्री प्रदीप तटाळे (एनसीडी समुपदेशक, जिल्हा रुग्णालय धाराशिव), श्रीमती भाग्यश्री हिरेमठ (एनसीडी समुपदेशक, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर) तसेच श्री कृष्णा सावंत (नर्सिंग ऑफिसर, जिल्हा रुग्णालय धाराशिव) यांनी सहभाग घेतला. याशिवाय मंदिर संस्थानचे स्वच्छता निरीक्षक मनोज घोडगे, सहायक स्वच्छता निरीक्षक सुमित रघुजीवार आणि सहायक सुरक्षा निरीक्षक ऋषभ रेहपांडे यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.

मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांना आवाहन करण्यात येते की, मंदिर व मंदिर परिसर हे पवित्र तसेच सार्वजनिक स्थळ असल्याने येथे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळावे. परिसरात कोणी थुंकताना आढळल्यास संबंधित व्यक्तीचा फोटो काढून ९०९६८५२७२५ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवावा. प्राप्त तक्रारींवर मंदिर संस्थानच्या वतीने तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

मंदिर व मंदिर परिसरात स्वच्छता राखण्याबाबत सूचना देणारे फलक जागोजागी लावण्यात आले असून, त्या फलकावरील नमूद केलेल्या ९०९६८५२७२५ या व्हॉट्सअँप क्रमांकावर आपली स्वच्छतेसंदर्भातील तक्रार नोंदवावी तसेच भाविकांनी नियमांचे पालन करून स्वच्छता राखण्यास सहकार्य करावे असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *