पिंपळे गुरव येथील भाविकाची तुळजाभवानी चरणी अनोखी सेवा; अर्धा किलो चांदीचे दागिने अर्पण

Spread the love

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी पुण्यातील पिंपळे गुरव येथील एका भाविकाने अर्धा किलो वजनाचे चांदीचे दागिने (वाहिक) अर्पण करत आपली अढळ श्रद्धा व्यक्त केली आहे. या दागिन्यांमध्ये एका सुबक चांदीच्या मुकुटासह देवीसाठी खास घडवलेल्या कानातील माशांचा समावेश आहे.

पुण्यातील पिंपळे गुरव परिसरातील रहिवासी असलेले भाविक दिगंबर बसवंतराव बिरादार हे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आज तुळजापुरात आले होते. देवीचे विधीवत आणि मनोभावे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत, देवीच्या चरणी हे अर्धा किलो वजनाचे चांदीचे दागिने अर्पण केले.

दिगंबर बिरादार यांनी केलेल्या या भक्तीपूर्ण अर्पणाबद्दल श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विकास वाणी, महेश गंजे, सूरज घुले यांच्यासह मंदिर संस्थानचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. देवीच्या चरणी नतमस्तक होत बिरादार यांनी केलेल्या या दातृत्वाची मंदिर परिसरात चर्चा होती.

  • Related Posts

    विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर दि. २३ (प्रतिनिधी )छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे जिल्हास्तरीय विविध विभागांची आढावा…

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – कर्नाटक राज्यातील बीदर येथील प्रणय बेमलखेडकर यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण केला. प्रणय बेमलखेडकर हे आपल्या कुटुंबीयांसह आज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *