तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीचा प्रयत्न उधळला; महिला रंगेहात पकडली

Spread the love

तुळजापूर : श्री आई तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न उधळण्यात आला असून एका महिलेला रंगेहात पकडण्यात आले आहे. निंबाळकर दरवाजा ते राजे शहाजी महाद्वार परिसरातील पाटीलवाडा येथे ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोणी काळभोर येथील भाविक सुरेखा वाडकर यांच्या पर्स व दागिने चोरण्याचा प्रयत्न सरोज पवार या महिलेकडून केला जात होता. यावेळी कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक प्रतीक धनके व लहू बोंदर यांनी संशयास्पद हालचाली ओळखून तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित महिलेला रंगेहात पकडले.

यानंतर आरोपी महिलेला मंदिर पोलिस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर यांच्या ताब्यात देण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी तिला तुळजापूर पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले आहे.

या कारवाईवेळी सहायक सुरक्षा निरीक्षक श्रीकांत पवार, प्रतीक दिवाणजी, सुरक्षा पर्यवेक्षक बिभीषण माने, योगेश फडके यांच्यासह मंदिर संस्थानचे इतर सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *