संत गोरोबा काका समाधी सोहळ्यात नवा पायंडा

Spread the love

यंदापासून दरवर्षी रंगणार ‘मंदिर पायरी समाधी भजन सोहळा’; हजारो भाविक भक्तिरसात तल्लीन

तेर (जि. धाराशिव) : वैराग्य महामेरू संत गोरोबा काका यांच्या समाधी सोहळ्यात यंदापासून एका नव्या आणि स्तुत्य परंपरेची सुरुवात करण्यात आली आहे. वारकरी, फडकरी आणि दिंडी संघटनेच्या वतीने यावर्षी पहिल्यांदाच ‘मंदिर पायरी समाधी भजन सोहळा’ आयोजित करण्यात आला. यापुढे दरवर्षी ही परंपरा कायम ठेवली जाणार असून, या पहिल्यावहिल्या सोहळ्यात हजारो भाविक भक्तिरसात तल्लीन झाले होते.

वारकरी फडकरी दिंडी संघटना (श्री क्षेत्र तेर) जिल्हाध्यक्ष ह.भ.प. महादेव महाराज तांबे आळणीकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व वारकरी आणि फडकऱ्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत या नव्या उपक्रमाचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानुसार, सर्व वारकरी, फडकरी आणि दिंड्यांसोबत आलेल्या तमाम भाविकांच्या वतीने या भजन सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले.

बाराव्या शतकातील थोर संत आणि ‘संत परीक्षक’ अशी गोरोबा काकांची संत साहित्यात मोठी ख्याती आहे. त्यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध दिंड्या मोठ्या भक्तिभावाने तेर नगरीत दाखल होतात. त्यामुळे तेरणा नदीकाठी हा सोहळा अधिकच भक्तिमय होतो. बाराव्या शतकापासून चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात आणि श्रद्धेने जोपासली जात आहे.

काकांचा हा अगाध महिमा चिरंतन राहावा, या उदात्त हेतूने समस्त वारकरी, फडकरी भजन संघटना (पंढरपूर अंतर्गत उपशाखा तेर) यांच्या वतीने सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हा पायरी भजन सोहळा पार पडला. यापुढेही दरवर्षी ही परंपरा अखंडितपणे सुरू राहील, असे यावेळी जाहीर करण्यात आले.

या सोहळ्याप्रसंगी ह.भ.प. विष्णू महाराज कबीर, ह.भ.प. राशनकर महाराज पंढरपूरकर, ह.भ.प. महादेव महाराज तांबे आळणीकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर तांबे महाराज आळणीकर, ह.भ.प. अर्जुन महाराज लाड, ह.भ.प. थोपटे महाराज देहूकर, ह.भ.प. योगेश्वर महाराज इंगळे, ह.भ.प. एकनाथ महाराज कापसे यांच्यासह तेरचे सरपंच फंड, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोरे आळणीकर, सुधाकर बुकन आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय राज्यातील विविध ठिकाणांहून आलेले फडकरी, दिंडी प्रमुख आणि भाविकांची मोठी मांदियाळी या वेळी पाहायला मिळाली.


  • Related Posts

    विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर दि. २३ (प्रतिनिधी )छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे जिल्हास्तरीय विविध विभागांची आढावा…

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – कर्नाटक राज्यातील बीदर येथील प्रणय बेमलखेडकर यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण केला. प्रणय बेमलखेडकर हे आपल्या कुटुंबीयांसह आज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *