विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले

Spread the love

तुळजापूर दि. २३ (प्रतिनिधी )छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे जिल्हास्तरीय विविध विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी ते तुळजापूर येथे आले होते.

दर्शनानंतर विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. विकासकामांची सद्यस्थिती, प्रगती आणि नियोजनाबाबत माहिती जाणून घेतली.

यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने मा. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचा सत्कार करण्यात आला. मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते त्यांना कवड्याची माळ व श्री तुळजाभवानी देवीजींची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी तहसीलदार तथा विश्वस्त, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, अरविंद बोळंगे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’मधून जलसंधारणाचा संदेश

    Spread the love

    Spread the loveपाणी व माती संवर्धनासाठी धाराशिवकरांची एकजूट ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग धाराशिव – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात आला.पाणी…

    विकसित भारतासाठी विकसित धाराशिव’चा संकल्प ;

    Spread the love

    Spread the loveशेतकरी,महिला,युवक आणि उद्योग विकासाच्या केंद्रस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू आहे.शेतकऱ्याच्या हातात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *