आकाश कोकाटे यांच्याकडून स्वराज्य ध्वजस्तंभ व शिवजयंती तयारीची पाहणी.

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येणाऱ्या ऐतिहासिक स्वराज्य ध्वजस्तंभाच्या कामाची तसेच मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती निमित्त सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांनी केली.
शिवजयंती उत्सव हा केवळ उत्सव न राहता शिवरायांच्या विचारांचे संस्कार समाजात रुजावेत, या हेतूने विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सर्वधर्मीय सामुदायिक बिगरहुंडा विवाह सोहळा, समाजजागृतीपर उपक्रम व प्रेरणादायी कार्यक्रमांद्वारे शिवजयंती अधिक अर्थपूर्ण व स्मरणीय करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.
यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

    Spread the love

    Spread the loveश्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. आज सकाळी मंदिर परिसरातील गणेश विहार येथे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया…

    वंदे मातरमच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याची दिमाखदार सांगता

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विशेष दोन दिवसीय सांस्कृतिक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *