आयुष्मान कार्ड ई-केवायसीसाठी विशेष मोहिम ९ ते २३ डिसेंबर दरम्यान गावोगावी मोहीम

Spread the love

धाराशिव – : एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याकरीता जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत जिल्ह्यात सध्या १५.२३ लक्ष लाभार्थी असून त्यापैकी ६.८० लक्ष लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड ई-केवायसी झालेले आहे.उर्वरित लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आशा कर्मचारी, स्वस्त धान्य दुकान चालक व आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी यांना प्रती यशस्वी ई-केवायसीसाठी २० रुपये व आयुष्मान कार्ड वितरणासाठी १० रुपये,असे एकूण ३० रुपये मानधन स्वरूपात देण्याबाबत शासन निर्णय पारित झाला आहे.

या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंत मोफत शस्त्रक्रिया व उपचाराची सुविधा १३५६ आजारांवर उपलब्ध आहे.हा लाभ धाराशिव जिल्ह्यातील २७ खाजगी व १३ शासकीय अशा एकूण ४० रुग्णालयांमध्ये तसेच महाराष्ट्रातील सुमारे २३०० शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये घेता येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र,CSC केंद्र,आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत मोफत आयुष्मान कार्ड काढून देण्यात येणार आहे.जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा,तसेच ७० वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांनी आयुष्मान वय वंदना कार्ड काढून घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले आहे.

ही विशेष मोहिम ९ डिसेंबर २०२५ पासून २३ डिसेंबर २०२५ पर्यंत राबविण्यात येणार आहे.या कालावधीत नमूद कर्मचारी गाव, वार्ड,वाडी,वस्ती,शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन आयुष्मान कार्डची ई-केवायसी करणार आहेत. तसेच लाभार्थ्यांना स्वतःचे ई-केवायसी स्वतः करता यावे, यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे.अँड्रॉईड मोबाईलमध्ये आयुष्मान अ‍ॅप डाऊनलोड करून अ‍ॅपमधील ‘बेनिफिशरी’ बटनवर क्लिक करून लाभार्थी स्वतःचे ई-केवायसी कार्ड काढू शकतात. तसेच आपल्या गावातील ग्रामपंचायत, CSC केंद्र,आशा स्वयंसेविका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधूनही ई-केवायसी करून घेता येणार आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्मान कार्डची ई-केवायसी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली गावनिहाय नियोजन करून राबविण्यात येत आहे.सर्व विभागांच्या समन्वयातून व सहकार्याने डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांची १०० टक्के आयुष्मान कार्ड ई-केवायसी पूर्ण करण्यात येणार आहे.

  • Related Posts

    90 लाखांचा स्वराज्य ध्वज, हरित धाराशिव अभियान – पालकमंत्री सरनाईकांचा दौरा

    Spread the love

    Spread the loveतुळजाभवानी नवरात्र, प्रशासकीय व हॉस्पिटल आढावा – खासदार ओमराजेंच्या घरी भेट धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे शनिवारी 15 ऑगस्ट…

    पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मुख्य शासकीय ध्वजारोहणभारतीय स्वातंत्र्य दिनाचा ८० वा स्वातंत्र्य दिन समारंभ

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ८० वा स्वातंत्र्य दिन समारंभ शनिवार,दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिवच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *