तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा; १९ हजारांची रोकड असलेली पिशवी केली परत

Spread the love

तुळजापूर : श्री आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाची गर्दीत हरवलेली, १९ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेली पिशवी मंदिर सुरक्षारक्षकाने प्रामाणिकपणे परत केल्याची घटना घडली आहे. तुकाराम घोरपडे असे या प्रामाणिक सुरक्षारक्षकाचे नाव असून, त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील कोकलगाव येथील रहिवासी असलेल्या कलावती शिवाजी केदारी या बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. गर्दी असल्याने त्यांची पैशांची पिशवी कुठेतरी पडली. दरम्यान, मंदिर परिसरात गस्त घालत असलेले SISPL कंपनीचे सुरक्षारक्षक तुकाराम घोरपडे यांना ही पिशवी सापडली.

घोरपडे यांनी तात्काळ पिशवी दर्शन मंडप नियंत्रण कक्षात जमा केली. त्यानंतर ओळख पटवून ती कलावती केदारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. पिशवीमध्ये १९ हजार ६७७ रुपये रोख रक्कम होती. आपली हरवलेली पिशवी आणि त्यातील रक्कम सुखरूप परत मिळाल्याने केदारी यांनी समाधान व्यक्त करत घोरपडे यांचे आभार मानले.

यावेळी मंदिर सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, फिल्ड ऑफिसर बिभीषण माने, सुरक्षा निरीक्षक अक्षय अनिल घुगे, सुरक्षा निरीक्षक योगेश फडके व इतर सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *