धाराशिवच्या व्यापाऱ्याकडून तुळजाभवानी चरणी ११ किलो चांदीच्या समई अर्पण

Spread the love

तुळजापूर: कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी धाराशिव  येथील एका सराफ व्यापाऱ्याने ११ किलो वजनाच्या दोन भव्य चांदीच्या समई अर्पण केल्या आहेत. देवीवरील अपार श्रद्धेतून त्यांनी ही मौल्यवान भेट दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव येथील या देवीभक्त व्यापाऱ्याने भक्तिभावाने या दोन समई देवीसाठी अर्पण केल्या. या दोन्ही समईंचे एकूण वजन ११ किलो असून, त्यांची अंदाजे किंमत १६ लाख ७० हजार रुपये इतकी आहे.

या अनमोल भेटीबद्दल श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने संबंधित व्यापाऱ्याचा यथोचित सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार मानण्यात आले. याप्रसंगी मंदिर संस्थानचे विश्वस्त, अधिकारी, पुजारी आणि इतर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यापाऱ्याच्या या उदार दातृत्वाने देवीभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची मूर्ती अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – नांदेड येथील भाविक सचिन सैनाजी खिल्लारे यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची तुळजाभवानी देवींची मूर्ती अर्पण केली. सचिन खिल्लारे हे आज…

    अधिक मास व उन्हाळी सुट्टीनिमित्त तुळजाभवानी मंदिरातील पूजेच्या वेळेत बदल

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिरात अधिक मास व उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी पूजेच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *