तुळजापूर श्री आई तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवाची धामधूम

Spread the love

तुळजापूर : उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री आई तुळजाभवानी मंदिरात यंदाचा शारदीय नवरात्र महोत्सव शके १९४७ दिमाखात साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मंदिर संस्थानतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, हा महोत्सव १४ सप्टेंबर २०२५ ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पार पडणार आहे.

१४ सप्टेंबर रोजी भाद्रपद वद्य अष्टमीला देवीची मंचकी निद्रा होऊन महोत्सवाला प्रारंभ होईल. २२ सप्टेंबर रोजी पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना व दुपारी घटस्थापना होणार असून त्यानंतर नवरात्राच्या नऊ दिवसांत नित्योपचार पूजा, रात्रौ छबिना आणि विविध अलंकार महापूजा पार पडतील.

२६ सप्टेंबर रोजी ललिता पंचमी, २७ सप्टेंबरला मुरली अलंकार महापूजा, २८ सप्टेंबरला शेषशायी अलंकार महापूजा तर २९ सप्टेंबरला भवानी तलवार अलंकार महापूजा पार पडणार आहे. ३० सप्टेंबरला दुर्गाष्टमी निमित्त देवीची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा, वैदिक होम व हवन तसेच पूर्णाहुती सोहळा होईल.

१ ऑक्टोबर रोजी महानवमीच्या दिवशी घटोत्थापन सोहळा, नगरहून येणाऱ्या पलंगाची मिरवणूक तसेच बुऱ्हाणनगर येथून येणाऱ्या संत जानकोजी भगतांच्या पालखीचे आगमन होणार आहे. २ ऑक्टोबरला विजयादशमीनिमित्त सार्वत्रिक सिमोल्लंघन, देवीचे शिविकारोहन व शमीपूजन होईल.

यानंतर ६ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा, ७ ऑक्टोबरला मंदिर पौर्णिमा निमित्त विशेष पूजा, छबिना व जोगवा आयोजित केला आहे. ८ ऑक्टोबर रोजी महोत्सवाचा समारोप देवीच्या नित्योपचार पूजा, अन्नदान महाप्रसाद व छबिन्याने होणार आहे.

या काळात देशभरातून लाखो भाविक तुळजापूरला भेट देऊन श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा लाभ घेणार आहेत. मंदिर प्रशासन आणि संस्थानने भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधांची व्यवस्था केली असून, भाविकांनी शिस्त, स्वच्छता व परंपरेचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *