तुळजापुरात विक्री करता येणारे एमडी ड्रग्स पकडले,स्थानिक गुन्हे शाखा व तामलवाडी पोलीसांची संयुक्त कारवाई

Spread the love

तुळजापूर – पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे तामलवाडी यांना अमली पदार्थ विक्री करणारे इसमां वर कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे तुळजापूर उपविभागात गस्त करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काही इसम अमली पदार्थ विक्रीकरिता तुळजापूर येथे आणणार अशी खात्री लायक बातमी मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ तामलवाडी पोलिसांची मदत घेऊन सोलापूर तुळजापूर महामार्गावर गस्त केली असता तामलवाडी टोल नाक्याच्या पुढे तुळजापूरच्या दिशेने एक मोटर कार संशयितरित्या थांबलेली दिसून आली तसेच कार मध्ये तीन इसम बसलेले दिसून आले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे कडे एमडी हा अम्ली पदार्थअसल्याचे सांगितले. त्यांनी एमटी हा अमली पदार्थ मुंबईतून तुळजापुरात विक्रीकरिता आणल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून 59 पुड्या एमडी अमली पदार्थ किंमत 2,50,000₹ तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन व मोबाईल असा एकूण 10,75,000₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेतलेले इसमांची नावे अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी दोघे राहणार तुळजापूर व संदीप संजय राठोड राहणार नळदुर्ग अशी असून सदर इसमांना पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे तामलवाडी येथे जप्त मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे. सपोनी कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील नमूद इस्मविरुद्ध एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशा, धाराशिव चे सपोनि- सुदर्शन कासार, पोलीस ठाणे तामलवाडीचे सपोनि गोकुळ ठाकुर, पोउपनि लोंढे, स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, जावेद काझी, चालक रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले, तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार माने, सलगर, सुरनर, चौगुले, चालक शेख यांच्या पथकाने केली आहे.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *