उसाच्या आडून अफूची शेती;२७ लाखांचे अफूचे पीक जप्त ,शिराढोण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Spread the love

कळंब  – तालुक्यातील खामसवाडीत चक्क उसाच्या फडामध्ये आंतरपीक म्हणून अफूची झाडे लावून अवैद्यरित्या व्यवसाय करत असल्याचा प्रकार शिराढोण पोलिसांनी उघड करून सदरील आरोपीस पकडून व घटनास्थळी जाऊन २७ लाख ७८ हजारांची अफूची झाडे ताब्यात घेतल्याची घटना (दि.१४) शुक्रवार रोजी घडली.
शिराढोण पोलीस ठाण्यामध्ये (दि.१५) शनिवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील शेतकरी संभाजी उर्फ बंडू भीमराव हिलकुटे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी गट नंबर ११९ व १२१ शेतामधील उसामध्ये आंतरपीक म्हणून अफूची झाडे लावली होती कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला अथवा एनडी पीएस चे कलम ४२ मध्ये केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक माहिती न देता स्वतःच्या फायद्यासाठी अफूच्या पिकाची लागवड करून स्वतःच्या शेतामध्ये चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या अफूच्या झाडाची लागवड केलेली मिळून आली उपनिरीक्षक शिराढोण यांच्या फिर्यादीवरून आरोपी संभाजी हिलकुटे यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 31/2025 कलम 15 व 18 एन डी पी एस नुसार दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस अधीक्षक संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन कळंब उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर हे करत आहेत या कारवाई मध्ये कळंब पोलिस ठाणेचे निरीक्षक रवी सानप व त्यांची पथक ,पोलीस उपनिरीक्षक तांबडे, बीट जमादार राजुदास राठोड व इतर कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *