खिरणी मळ्यातून ११०० किलो गोवंशीय मास जप्त

Spread the love

धाराशिव शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरातील खिरणीमळा परिसरात गोवंशीय मास असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लागलीच यंत्रणा कार्यान्वित करुन त्या ठिकाणी छापा टाकून १ टन १०० किलो गोवंशीय मास व पिकअप असे दोन्ही मिळून ५ लाख २० हजारांचा जप्त करून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही दमदार कामगिरी धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील एस शेख व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी दि.२० फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.२० फेब्रुवारी रोजी संध्याकाळचे ६.४५ वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील एस. शेख हे पोलीस ठाण्यात हजर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, धाराशिव शहरातील खिरणीमळा येथे एका पिकअपमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करुन त्यांचे मास ठेवण्यात आलेले आहे. वगैरे माहिती प्राप्त झाल्यावरुन लागलीच पोलीस निरीक्षक शकील एस. शेख हे त्यांच्या अधिनिस्त पोलीस अंमलदार यांच्यासह सरकारी वाहनाने वरील प्रमाणे मिळाले गोपनीय माहिती ठिकाणी संध्याकाळचे ७.२० वाजता जावून पाहणी केली असता त्याठिकाणी एका पांढऱ्या रंगांचे महिंद्रा पिकअप क्रमांक (एम.एच.- २५ बी – ७७७७) हा मिळूण आला. त्या पिकअपचा चालक धाराशिव शहरातील ख्वॉजा नगर गल्लीतील खुर्शीद पाशा शेख हा तेथे हजर होता. त्या पिकअपच्या पाठीमागील ट्रॉलीमध्ये पोलीसांनी पाहणी केली असता त्यामध्ये गोवंशीय मास असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पिकअप चालक शेख यास विचारपूस केली असता तो पिकअप व त्यामधील गोवंशीय मास हे धाराशिव शहरातील ख्वॉजा नगर गल्लीतील अमीर मुक्तार यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले. त्यामुळे ते पांढऱ्या रंगांचे महिंद्रा पिकअप किंमत अंदाजे ३ लाख रुपयांचे व त्यामधील अंदाजे ११०० किलो ग्रॅम वजनाचे गोवंशीय जनावरांचे कत्तल केलेले मास किंमत अंदाजे २ लाख २० हजार रुपयांचे असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन त्या दोन्ही आरोपी विरुध्द धाराशिव शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना बीड टाकले आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उप विभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शकील एस. शेख, पोलीस उप निरीक्षक अक्षय डिघोळे, पोलीस हवालदार चक्रधर पाटील, रमाकांत जगताप, शशिकांत जाधवर, विशाल चव्हाण, व आनंत आडगळे यांनी केली आहे.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *