दिवसा ढवळ्या देशी व विदेशीची चोरटी विक्री करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Spread the love

धाराशिव शहर पोलीसांची दमदार कामगिरी

धाराशिव – दिवसाढवळ्या शहरात देशी व विदेशी दारूची चोरट्या मार्गाने विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे गल्लोगल्ली तळी रामाची संख्या देखील दिवसेंदिवस वाढू लागले आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने त्या चोरट्या दारुड्या विक्रेत्यास मुसक्या आवळून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

धाराशिव शहरचे पोनि शेख यांनी अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यामुळे धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे डी बी पथकाचे पोउपनि संदीप ओहोळ, पोहेकॉ आर.बी. पठाण, पोलीस अंमलदार जमादार व बीट मार्शलचे पोलीसं अंमलदार गायकवाड, कांबळे यांच्यासह हद्दीत पेट्रोलींग करीत असताना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक इसम एक पिवळ्या रंगाच्या पोत्यामध्ये खांद्यावर विना पास परवाना बेकायदेशीररित्या देशी व विदेशी दारूचा चोरटा विक्री व्यवसाय करण्यासाठी काळा मारुती चौक ते माऊली चौकाकडे जात असल्याची खत्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस स्टाफ व पंच असे माऊली चौकात आले असता एक इसम एक पिवळ्या रंगाच्या पोत्यामध्ये खांद्यावर विना पास परवाना बेकायदेशीररित्या देशी व विदेशी दारू चोरटा विक्री व्यवसाय करण्यासाठी गुन्ह्याचा माल घेवून जात असताना दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास मिळून आला. त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव धाराशिव तालुक्यातील रुईभर येथील पाडुरंग हरी लाड (वय ३५ वर्ष) याच्या कब्जातून देशी व विदेशी असा एकूण १४ हजार ३७० रुपयांचा मुद्येमाल ताब्यात घेण्यात आला‌. ही कामगिरी पोलीस अधिक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग धाराशिव स्वप्नील राठोड, धाराशिव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्या यशमार्गदर्शनाखाली धाराशिव शहरचे डी बी पथकाचे पोउपनि ओहोळ, पोहेकॉ आर. पठाण, जमादार व बीट मार्शलचे पोलीसं अंमलदार गायकवाड व कांबळे यांनी केली.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *