भवानी ग्रुप शिवजन्मोत्सव समितीच्या शहराध्यक्षपदी मगर तर ग्रामीण अध्यक्षपदी कोंढारे

Spread the love

महाआरोग्य शिबिर व छत्रपती. शिवरायांवर आधारित भव्य महानाट्याचे आयोजन

धाराशिव  (प्रतिनिधी) – येथील भवानी ग्रुप शिवजन्मोत्सव समितीच्या शहराध्यक्षपदी नितीन मगर यांची तर ग्रामीण अध्यक्षपदी अनिकेत कोंढारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दरम्यान, या समितीच्यावतीने महाआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व छत्रपती शिवरायांवर आधारित भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

धाराशिव येथील भवानी शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यकारिणीचे गठन करण्यासाठी भवानी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष लिंबराज डुकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व छत्रपती शिवरायांवर आधारित भव्य महानाट्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच उर्वरित कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये समितीच्या उपाध्यक्षपदी दीपक काळे, तेजस भोरे व शुभम शिंदे यांची तर सचिवपदी रोहन धोत्रे व ओंकार गुळवे यांची तसेच सहसचिवपदी विजय येरकळ व विष्णू डोलारे यांची तर कार्याध्यक्षपदी पृथ्वीराज मोटे व राम निचळ यांची तसेच सह कार्याध्यक्षपदी निखिल ढगे व बालाजी गडदे यांची तसेच कोषाध्यक्षपदी निलेश कांबळे व समाधान हराळे यांची तर संघटकपदी अभिजित धर्मे व रियाज तांबोळी यांची तसेच सहसंघटकपदी अजय माने, शरद शिंदे व अजय विधाते यांची तर सोशल मीडिया प्रमुखपदी शुभम कांबळे व नारायण चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. सूत्रसंचालन जयंतीचे माजी अध्यक्ष ऍड प्रवीण उर्फ शंकर शेटे यांनी केले.
या बैठकीस सदानंद अकोस्कर, विकी अंधारे, शरद स्वामी, विजय कोळी, सचिन खटके, सुरज जावळे, सचिन राठोड, आकाश जाधव, आकाश बिडवे, सोनू जावळे, नितीन चांदणे, फंटू काशीद, अक्षय टापरे, दत्ता माने, नरेश लेनेकर, अभि भोसले, निलेश टापरे, सोनू घुले, महेश चौगुले, बाळ मुंडे, बबलू तांबोळी, समाधान पडळकर, विशाल गाढवे, रोहन गाढवे, शुभम नरटे, गिरीश बोचरे, अमोल गौड, अजय तेरकर, कृष्णा डोलारे, किशोर डुकरे, रोहित राठोड, ओंकार दस आदी उपस्थित होते.

  • Related Posts

    क्रांतिसूर्य अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करून स्वावलंबी बनविण्याचा ध्यास घेतलेल्या क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याला त्यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त धाराशिव येथील…

    छत्रपती संभाजी महाराजांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *