हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याना धाराशिव येथे अभिवादन

Spread the love

धाराशिव – हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष केला.

महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांची एकजूट करून त्यांना स्वाभिमानाचे बाळकडू देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आज मराठी जनता ताठ मानेने जगत आहे. त्यांच्या कर्तृत्वाची धमक पाहून दिल्लीचे तख्त देखील अनेकदा त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. त्यांच्या पश्चात पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे शिवसेनेची धुरा सक्षमपणे सांभाळत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करत असताना शिवसेनेची पाळेमुळे घट्ट करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात शिवसेना पक्षाचा दबदबा कायम आहे. त्यांच्या विचारांचा वारसा तमाम शिवसैनिकांनी पुढे चालवावा अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    छत्रपती संभाजी महाराजांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

    धाराशिव – वीररत्न शिवाजी काशीद व जिवाजी महाले प्रतिष्ठान उपळे (मा) ता.जि. धाराशिव यांच्यावतीने वीररत्न शिवाजी काशीद यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली.

    Spread the love

    Spread the loveतसेच शिवा काशिद जयंती निमित्त व गयाबाई श्रीमंत पवार यांच्या स्मरणार्थ स्वधार मतिमंद मुलीचे बालग्रह येथे फळ वाटप करण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *