दुष्काळात प्रत्येक चाऱ्याच्या काडीचे मोल

Spread the love

मंगरूळच्या नवजीवन गोशाळेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

  • कमी प्रतीचा चारा थेट जनावरांना देऊ नका
  • योग्य प्रक्रिया,पूरक खाद्य व खनिज मिश्रणासह वापरण्याच्या सूचना
  • चारा-पाण्याच्या काटेकोर नियोजनासह पशुधनाच्या आरोग्याची नियमित देखरेख करण्यावर भर

धाराशिव – दुष्काळाच्या झळा शेतीबरोबरच मुक्या पशुधनालाही बसत असताना उपलब्ध चाऱ्याच्या प्रत्येक काडीचा शास्त्रीय आणि काटकसरीने वापर करणे महत्त्वाचे ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा व पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आज ६ ऑक्टोबर रोजी मंगरूळ, ता.कळंब येथील नवजीवन गोशाळेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी गोशाळेतील पशुधनाची संख्या,उपलब्ध चाऱ्याचा साठा,पाण्याची व्यवस्था तसेच पशुधनाच्या दैनंदिन व्यवस्थापनाची देखील पाहणी केली.गोशाळेतील जनावरांची निगा कशी राखली जाते,त्यांच्यासाठी चारा-पाण्याचे नियोजन कशा पद्धतीने केले जाते,याबाबत त्यांनी गोशाळा व्यवस्थापनाकडून आवश्यक माहिती जाणून घेतली.

निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करूनच पशुधनाला द्या
दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याची उपलब्धता मर्यादित होत असल्याने उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने आणि शास्त्रीय पद्धतीने वापर करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कमी प्रतीचा अथवा उपलब्धतेनुसार निकृष्ट दर्जाचा चारा थेट जनावरांना न देता त्यावर आवश्यक प्रक्रिया करावी. त्यासोबत योग्य प्रमाणात पूरक खाद्य आणि खनिज मिश्रणाचा वापर करूनच तो पशुधनाला द्यावा,अशा सूचना त्यांनी केल्या.
उपलब्ध चाऱ्याचे योग्य नियोजन करून त्याचा अपव्यय टाळावा. चारा खराब होणार नाही यासाठी त्याच्या साठवणुकीची योग्य व्यवस्था करावी.त्याचबरोबर पशुधनाची गरज लक्षात घेऊन संतुलित आहार उपलब्ध करून द्यावा,असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

चाऱ्यासोबत आरोग्याचीही काळजी महत्त्वाची
दुष्काळी परिस्थितीत केवळ चारा उपलब्ध करून देणे पुरेसे नसून पशुधनाच्या आरोग्याची सातत्याने काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.चारा आणि पाण्याच्या कमतरतेचा जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये,यासाठी नियमित पशुवैद्यकीय तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचार करावेत,अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
गोशाळेतील जनावरांना स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी नियमित उपलब्ध करून द्यावे.गोशाळेच्या परिसरात स्वच्छता राखावी आणि पशुधनाच्या आरोग्याची नियमित देखरेख करावी,असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुक्या पशुधनासाठी नियोजनाची गरज
दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांसमोर स्वतःच्या कुटुंबासोबतच पशुधनाच्या चारा-पाण्याची चिंता असते.अशा परिस्थितीत उपलब्ध चारा योग्य प्रक्रियेद्वारे अधिक उपयुक्त बनविणे,त्याचा अपव्यय रोखणे आणि पशुधनाला संतुलित आहार देणे महत्त्वाचे ठरते.त्यामुळे उपलब्ध साधनसामग्रीचा अधिकाधिक प्रभावी वापर करून पशुधनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी संबंधित गोशाळा चालक व तेथील कर्मचारी,जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन,धाराशिव,तहसीलदार, कळंब,तालुका पशुसंवर्धन अधिकारी तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
.

  • Related Posts

    दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार : सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावेजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे आवाहन ; ८ ऑक्टोबरला बैठक

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजनांना गती दिली आहे.या प्रयत्नांना सेवाभावी संस्था,व्यक्ती आणि महाविद्यालयांची साथ मिळाल्यास दुष्काळाशी अधिक प्रभावीपणे सामना…

    नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना CPR प्रशिक्षण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचा शारदीय नवरात्र महोत्सव ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयातील तळमजल्यावर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *