
धाराशिव : NSKFDC (National Safai Karamcharis Finance & Development Corporation) यांच्या NAMASTE (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) योजनेअंतर्गत धाराशिव नगरपालिका हद्दीतील कचरावेचकांसाठी व्यावसायिक सुरक्षितता व कौशल्यवृद्धी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.


कचरावेचकांना कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना, आरोग्यविषयक काळजी, कचरा हाताळणीच्या सुरक्षित पद्धती तसेच आवश्यक कौशल्यांबाबत मार्गदर्शन करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.

सदर प्रशिक्षणाचे आयोजन अहिल्या शिक्षण संस्था, लातूर, यांच्या वतीने करण्यात आले. प्रशिक्षणासाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून श्री. अविनाश साखरे यांनी मार्गदर्शन केले, तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून श्री. प्रतीक सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.

या प्रशिक्षणामध्ये धाराशिव नगरपालिका हद्दीतील एकूण ४३ कचरावेचकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रशिक्षणादरम्यान कचरावेचकांच्या दैनंदिन कामातील संभाव्य धोके, वैयक्तिक सुरक्षा साधनांचा योग्य वापर, आरोग्य व स्वच्छता, कचऱ्याची सुरक्षित हाताळणी तसेच कामाशी संबंधित आवश्यक कौशल्यविकास याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. गोरे सर, स्वच्छता निरीक्षक (S.I.) तसेच मुख्याधिकारी अंधारे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले.

NSKFDCच्या NAMASTE योजनेच्या माध्यमातून कचरावेचकांच्या व्यावसायिक सुरक्षिततेसोबतच आरोग्य, कौशल्यविकास आणि सामाजिक सक्षमीकरणाला चालना देण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरले.